शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटन चालना, घनसाळ संवर्धन चर्चेपुरतेच

By admin | Updated: November 9, 2014 23:37 IST

अनेक प्रश्न अनुत्तरित : निधीचा अभाव; रोजगारनिर्मिती आवश्यक; वैद्यकीय, अभियांत्रिकी महाविद्यालयाची गरज--आजरा तालुका

ज्योतिप्रसाद सावंत - आजरा --जिल्ह्याच्या पश्चिम भागात वसलेल्या आजरा तालुक्याचा निसर्ग पर्यटकवर्गास निश्चितच मोहिनी घालणारा आहे. विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेत हा तालुका तीन विधानसभा मतदारसंघांत विभागला गेला आहे. सुकृतदर्शनी तालुक्याच्या दृष्टीने ही समाधानकारक बाब आहे; परंतु तालुक्यात येणारा निधी हा अपुरा असल्याने अनेक प्रश्न आजही अनुत्तरित आहेत.आजरा साखर कारखाना व त्यानंतर अलीकडेच सुरू झालेली सूतगिरणी ही रोजगार निर्मितीची केंद्रे असली, तरीही सहकारी संस्थांनी बऱ्यापैकी कुटुंबांना आधार देण्याचे काम केले आहे. सुशिक्षित बेरोजगार वर्ग काजू प्रक्रिया व पोल्ट्री व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबी बनत आहे; परंतु ग्रामीण भागातील युवक आजही रोजगारासाठी पुणे-मुंबई यासारख्या महानगरांकडे आकर्षित होत आहे. त्यासाठी तालुक्यात मोठा रोजगार निर्मिती उद्योग सुरू होणे आवश्यक आहे.तालुक्यातील उचंगी व सर्फनाला प्रकल्पांचे रेंगाळलेले प्रश्न मार्गी लावण्याची गरज प्रकर्षाने पुढे येत आहे. उचंगी प्रकल्प मार्गी लागल्यास पूर्व भागातील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपुष्टात निघणार आहे. आजरा बसस्थानकाच्या नूतनीकरणाची केवळ चर्चाच आहे. निधी मंजूर झाल्याचे सांगितले जाते, प्रत्यक्षात मात्र कारवाई शून्य आहे.शेतकरी मंडळाकडून घनसाळ भाताच्या संवर्धनासाठी प्रयत्न सुरू आहेत; मात्र त्यावर अनेक मर्यादा येताना दिसतात. ऊस पीक वाढीसाठीही खास प्रयत्न होताना दिसत नाहीत, तर काजू बियांची बोंडे मातीमोल भावाने विकली जात आहेत.तालुक्यातील क्रीडा संकुलाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी स्व. बाबासाहेब कुपेकर यांनी बरेच कष्ट घेतले; मात्र स्थानिक नेतेमंडळींना याचे गांभीर्यच नसल्याने क्रीडा संकुलाचे पुढे काय झाले? हा प्रश्न आजही कायम आहे. पदवी व पदव्युत्तर शिक्षण देणारे एकमेव महाविद्यालय आजरा तालुक्यात आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषिपूरक, शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना कोल्हापूर, सांगली यासारख्या शहरांशिवाय पर्याय राहिलेला नाही. स्थानिक शिक्षणाच्या सोयीसाठी स्व. अण्णा-भाऊशिवाय कोणीही प्रयत्न केलेले दिसत नाहीत. तालुक्यातील रस्ते, व्हिक्टोरिया पुलाला पर्यायी पुलाची उभारणी, साळगाव बंधाऱ्याची उंची वाढविणे हे प्रश्न ‘जैसे-थे’ आहेत. जंगली प्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीला शेतकरी वर्ग वैतागला आहे. अनेक शासकीय कार्यालये, आरोग्य सेवा पुरविणारी केंद्रे, पशुवैद्यकीय दवाखान्यातील जागा रिक्तच आहेत. बदललेल्या सरकारकडून तालुक्यातील प्रश्न मार्गी लागतील, अशी आशा आहे.शैक्षणिक प्रश्नआजरा तालुक्यात उच्च शिक्षणासाठी वैद्यकीय महाविद्यालय व अभियांत्रिकी महाविद्यालयाची गरज.तालुक्यातील कृषिउद्योग पार्श्वभूमी पाहता महाविद्यालयात कृषिआधारित अभ्यासक्रमांची आवश्यकताआजरा शहरमहिलांसाठी स्वच्छतागृहे नाहीआजरा-आंबोली मार्गाचे रुंदीकरण आवश्यकपाणीपुरवठा योजनेतील त्रुटी काढणे आवश्यकमटण, मच्छिमार्केटसह कत्तलखाना गावाबाहेर नेणे गरजेचेरोजगार निर्मितीमहाराष्ट्र राज्य विकास महामंडळाच्या जागी विविध उद्योग उभारण्याची गरजकाजू प्रक्रिया उद्योगाबरोबरच काजू बोंड प्रक्रिया उद्योग प्राधान्याने सुरू करणे आवश्यकजंगली फळांवर वनौषधी निर्मिती करणारे उद्योग उभे करणे गरजेचेपर्यटनाचे प्रश्नरामतीर्थ परिसर विकासासाठी निधी गरजेचातालुक्यातील रस्त्यांची दुरुस्ती आवश्यकचित्री प्रकल्पस्थळी बगीचा उभारण्याची गरजकृषी पर्यटन स्थळांची आवश्यकता.