जयसिंगपूर : राजस्थान येथे घर व पुणे येथे फ्लॅट घेण्याकरिता पैशाची मागणी करून व विवाहितेचा मानसिक छळ करून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पतीसह सासू व सासऱ्याविरुद्ध जयसिंगपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पती आशिष बाबूसिंग चौहान, सासू मीना चौहान, सासरा बाबूसिंग चौहान (सर्व रा. उंब्रज, ता. कराड, जि. सातारा) अशी संशयित आरोपींची नावे असून आशिष चौहान हे कुरुंदवाड नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी असून ते सध्या सक्तीच्या रजेवर असल्याचे समजते.विशाखा आशिष चौहान ( वय ३५, मूळ गाव मसूर, ता. कराड, सध्या रा. महावीर कॉलेजच्या पाठीमागे कोल्हापूर) यांनी दिली. सन २०१९ ते १४ जुलै २०२४ अखेर हा गुन्हा घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. वेळोवेळी संशयीत आरोपी यांनी तक्रारदार विशाखा यांचा मानसिक व शारीरिक छळ केला.
मूळगावी राजस्थान येथे घर घेण्यासाठी व पुणे येथे फ्लॅट घेण्याकरिता तक्रार यांच्या आईकडून दीड ते दोन लाख रुपये घेतले. शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. विशाखा यांच्या तक्रारीनंतर जयसिंगपूर पोलिसांनी चौहान यांच्यासह सासू व सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रात्री उशिरापर्यंत कोणालाही अटक नव्हती.