शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मूत मोठी घडामोड! दहशतवाद्यांनी लपवलेला सॅटेलाईट डिव्हाइस सापडला, सीमापार सुरु होता संपर्क
2
BMC Election 2026 : जय जवान पथकातील गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर दिली होती सलामी
3
"मला अजित पवारांवर कालही विश्वास होता आणि आजही आहे" सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
4
भारत-बांगलादेश वादात पाकिस्तानची 'लुडबुड'; स्वतःच्या देशात सुरक्षेचा पत्ता नाही आणि म्हणतंय...
5
भारतावर विश्वास ठेवा, इतरांच्या दाव्यांकडे दुर्लक्ष करा; भारत-अमेरिका करारावर गोयल यांची स्पष्टोक्ती
6
"मी यांना चॅलेंज देतो की, या ठाकरे बंधूंनी..."; भाजपच्या गिरीश महाजन यांचा आक्रमक पवित्रा
7
IND vs NZ 1st ODI : न्यूझीलंडकडून सलामी जोडीनंतर डॅरिल मिचेलची बॅट तळपली! टीम इंडियासमोर ३०१ धावांचं आव्हान
8
₹३६३४१२००००००० स्वाहा...! देशातील 7 कंपन्यांना मोठा फटका, रिलायन्सचं सर्वाधिक नुकसान 
9
‘आमच्यावर बॉम्ब फेकले तर अमेरिकेचे..., तणाव वाढत असताना इराणची थेट धमकी   
10
“हिंदू समाजाने एकत्र राहणे गरजेचे, २० वर्षांत भारत देश विश्वगुरू बनून जगाला...”: मोहन भागवत
11
भाजपा बलात्काऱ्यांनाही संधी देणारा पक्ष, बेटी बचाव बेटी पढाव नाही तर…’, काँग्रेसची बोचरी टीका
12
PM Modi: भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या वाटेवर; पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य
13
इलेक्ट्रिक वाहनांची 'सुसाट' धाव! २०२५ मध्ये २३ लाख ई-वाहनांची नोंदणी; कोणतं राज्य अव्वल?
14
IND vs NZ : डॉक्टर तरुणीची रोहितसाठी हटके फलकबाजी; मैत्रिणीने वामिकाचा उल्लेख करत विराटकडे केली 'ही' मागणी
15
१८० किमी प्रति तास वेग, कपल कूप ते शॉवर सुविधा; स्लीपर वंदे भारत सेवेस सज्ज, १७ जानेवारीला…
16
इराणमध्ये मोठी कारवाई करण्याच्या तयारीत अमेरिका? ट्रम्प यांच्या धमकीनंतर, इस्रायल 'हाय अलर्ट'वर
17
‘जैशकडे हजारो आत्मघाती हल्लेखोर…’, नव्या ऑडियोमधून मसूद अझहरची धमकी
18
कुत्र्याची भन्नाट हुशारी! तगड्या पिटबूलची 'अशी' केली फजिती; Video पाहून नेटकरीही थक्क
19
ट्रम्प यांच्या अमेरिकेत एक नवीन दहशत, गुलाबी कोकेन; सेवन केल्यावर शरीर निळे पडते
20
फॉर्म भरण्याचा त्रास संपला! UPI द्वारे PF काढता येणार; अवघ्या काही सेकंदात पैसे बँक खात्यात जमा
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: मूल होत नाही म्हणून पतीसह सासरच्या मंडळींकडून छळ; विवाहितेने पेटवून घेत जीवन संपविले, चौघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 18:11 IST

सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू असताना रात्री बाराच्या सुमारास तिचा मृत्यू झाला

जयसिंगपूर : चिपरी (ता. शिरोळ) येथे या विवाहितेने अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली. कोमल उर्फ कीर्ती किशोर आवळे (वय २७) असे तिचे नाव आहे. मात्र, कोमलने सासरच्या छळाला कंटाळूनच आत्महत्या केली असून तिच्या आत्महत्येस पती, सासू, दीर व भावजय जबाबदार असल्याची फिर्याद कुमार आदगोंडा कांबळे (रा. आळते, ता. हातकणंगले) यांनी जयसिंगपूर पोलिसात दिली आहे.आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती किशोर पट्टू आवळे, सासू शोभा पट्टू आवळे, दीर अतुल प्रशांत उर्फ पट्टू आवळे व जाऊ कोमल अतुल आवळे (सर्व रा. चिपरी, ता. शिरोळ) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, कोमल आवळे हिने चिपरी येथे गुरुवारी रात्री अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतल्याची घटना घडली होती. सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू असताना रात्री बाराच्या सुमारास तिचा मृत्यू झाला होता. या घटनेची नोंद जयसिंगपूर पोलिसात झाली होती. दरम्यान, तुला मूल होत नाही. किशोरचे दुसरे लग्न करतो असे म्हणून पतीसह सासरच्या मंडळींकडून तिचा मानसिक व शारीरिक छळ केला जात होता. या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. जयसिंगपूर पोलिसांनी शुक्रवारी रात्री पती, सासूसह चौघांना रात्री अटक केली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक युनूस इनामदार करीत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Woman Ends Life Due to Harassment; Four Arrested

Web Summary : A woman in Chipari, Kolhapur, tragically committed suicide due to relentless harassment from her husband and in-laws because she couldn't conceive. Police arrested the husband, mother-in-law, brother-in-law, and sister-in-law following a complaint filed by the woman's relative.