‘स्वातंत्र्य लढ्यातील शिलेदार’ पुस्तकाचे उद्या प्रकाशन;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:24 IST2021-03-26T04:24:33+5:302021-03-26T04:24:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शरद तांबट लिखित ‘१९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यातील कोल्हापूरचे शिलेदार’ या पु्स्तकाचे प्रकाशन उद्या, शनिवारी ...

Tomorrow's publication of the book 'Stone of the Freedom Fight'; | ‘स्वातंत्र्य लढ्यातील शिलेदार’ पुस्तकाचे उद्या प्रकाशन;

‘स्वातंत्र्य लढ्यातील शिलेदार’ पुस्तकाचे उद्या प्रकाशन;

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : शरद तांबट लिखित ‘१९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यातील कोल्हापूरचे शिलेदार’ या पु्स्तकाचे प्रकाशन उद्या, शनिवारी होत असल्याची माहिती उद्योजक आनंद माने यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. व्हिनस कॉर्नर येथील लोटस्‌ प्लाझा येथे सकाळी साडेदहा वाजता हा सोहळा होणार आहे.

शरद तांबट म्हणाले, स्वातंत्र्य लढ्यात कोल्हापुरातील स्वातंत्र्यवीरांनीही योगदान दिले आहे. त्या घटना त्याकाळी देशभर गाजल्या. गारगोटी येथील सात हुतामे, विल्सन नोज कट ते शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उभारणी, ब्रम्ही खजिना, बार्शी लाईट रेल्वे, बॉम्बस्फोट, बिंदू चौक, निवृत्ती चौक अशा घटनांमुळे ब्रिटिश सरकार हादरले. अशा घटनांवर हे पुस्तक आधारित आहे. यातील ४५ प्रकरणांमध्ये या घटना व त्यात योगदान देणारे स्वातंत्र्यसेनानी यांनी केलेल्या कार्याची माहिती व तत्कालीन छायाचित्रांचा समावेश आहे. श्रोत्यांंनी कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

परिषदेस शहिदा शेख, जयंत देशपांडे, प्रकाश पोवार, अनिल घाटगे, रविराज तांबट उपस्थित होते.

---

फोटो नं २५०३२०२१-कोल-बुक फोटो

---

Web Title: Tomorrow's publication of the book 'Stone of the Freedom Fight';