शहरं
Join us  
Trending Stories
1
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
2
"पैसे देणे होत नसेल, तर पत्नी माझ्या घरी आणून सोड"; व्याजाच्या पैशावरून त्रासाने संपवलं जीवन
3
ऐकावं ते नवलंच... अचानक लोकप्रिय ब्रँडच्या बिअर दुकानांमधून झाल्या गायब, राजधानीत नक्की काय झालं?
4
"हो मी पाकिस्तानी सैन्याचा एजंट होतो", तहव्वूर राणाने चौकशीमध्ये केले अनेक धक्कादायक गौप्यस्फोट
5
Crizac IPO Allotment Status: ६० पट सबस्क्रिप्शन, शेअर्स अलॉट झालेत का, कसं कराल चेक? GMP प्रीमिअमवर
6
फुलेरात पुन्हा येण्याची तयारी सुरु करा! 'पंचायत ५'ची अधिकृत घोषणा, 'या' दिवशी रिलीज होणार
7
खळबळजनक! दिवसाढवळ्या एका व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या
8
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवली 'गोळी'
9
किती वाईट दिसतंय ते? अंकिता लोखंडेचा लूक पाहून चाहते शॉक; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
10
हाफिज सईद पाकिस्तानात नाही? नेमका कुठे लपून बसलाय तोयबाचा म्होरक्या? 'या' व्यक्तव्यांमधून मिळाले मोठे संकेत
11
हृदयद्रावक! ११ महिन्यांच्या मुलीने गमावले आई-वडील, आजी; झाली अनाथ, डोळे पाणावणारा Video
12
चातुर्मासातील पहिले भौम प्रदोष व्रत: ‘असे’ करा पूजन, महादेवांची अखंड कृपा; शुभच होईल!
13
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा ग्रॅज्युएट; तरीही करतोय फूड डिलिव्हरीचं काम, महिन्याला लाखोंची कमाई
14
५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली?
15
Chaturmas 2025 Rangoli: चातुर्मासात दारासमोर रोज दोन बोटं रांगोळी काढा आणि लक्ष्मीकृपा मिळवा!
16
सुपरहिट सिनेमांचा साक्षीदार 'फिल्मीस्तान स्टुडिओ' अखेर विकला; फिल्म इंडस्ट्री भावुक
17
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ५ मूलांक लकी, विविध लाभच लाभ; यश-प्रगती-भरभराट, स्वामी कल्याण करतील!
18
भयंकर! दरोडेखोरांनी घरात घुसून पत्नी, मुलांसमोर केली इंजिनिअरची हत्या; पैसे, दागिने घेऊन पसार
19
अमेरिका-चीन व्यापार युद्धात अंबानींची एन्ट्री? बीजिंगला जाणारे गॅस जहाज आता थेट भारतात!
20
कर्नाटकातील अथणीत कार-बसचा अपघात, चौघे ठार; कोल्हापूरहून देवदर्शन करून परतताना काळाचा घाला

उद्या शंभर एकर जागा देतो, कोल्हापुरातील आयटी पार्क प्रश्नावर मंत्री चंद्रकांत पाटलांचे मोठं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 15:41 IST

‘कोल्हापूर फर्स्ट’च्या कार्यालयाचे उद्घाटन

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील सर्किट बेंच, इंडस्ट्री, आयटी यांसह विविध प्रश्न आहेत. हे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्यक्रम ठरवण्याची गरज असून मी पुण्याचा आमदार, सांगलीचा पालकमंत्री असलो तरी माझ्यासाठी कोल्हापूर फर्स्ट असल्याने हे प्रश्न सोडवण्यासाठी मी पुढाकार घेईन, अशी ग्वाही उच्च व तंत्रशिक्षण मंत्रीचंद्रकांत पाटील यांनी सोमवारी दिली.जिल्ह्यातील १८ विविध संस्था, संघटनांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या कोल्हापूर फर्स्टच्या कार्यालयाचे उद्घाटन मंत्री पाटील यांच्या हस्ते झाले. पालकमंत्री प्रकाश आबिटकर अध्यक्षस्थानी होते. मंत्री पाटील म्हणाले, कोल्हापूर फर्स्ट ही चळवळ असून, या माध्यमातून जिल्ह्यातील प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी हातभार लावण्याची गरज आहे. हे प्रश्न सोडवण्यासाठी आता प्राधान्यक्रम ठरवावा लागेल. जिल्ह्यातील उद्योगांना लागणारी वीज सौरऊर्जेवर उपलब्ध झाली तर वीजदर मोठ्या प्रमाणात कमी होईल. त्यामुळे सौरऊर्जेवरील विजेला प्राधान्य देणे गरजेचे आहे.

मंत्री आबिटकर म्हणाले, कोल्हापूर फर्स्ट जिल्ह्याच्या विकासासाठी एक चांगल्या प्रकारे समन्वयाची भूमिका बजावेल. जिल्ह्यातील जे प्रश्न प्रलंबित आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देऊच; पण कोल्हापूर फर्स्टच्या माध्यमातून जे विषय, प्रश्न मांडले जातील त्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहोत.कोल्हापूर फर्स्टचे अध्यक्ष सुरेंद्र जैन यांनी प्रास्ताविक केले. सर्किट बेंच, आयटी इंडस्ट्री, कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे, दक्षिण महाराष्ट्राचे पर्यटन हब हे प्रश्न सोडवण्यासाठी स्वतंत्र परिषद घेण्याची मागणी जैन यांनी केली. यावेळी बाळ पाटणकर, सर्जेराव खोत, सारंग जाधव, जयदीप पाटील, पद्मसिंह पाटील, स्वरूप कदम, अमोल कोडोलीकर, हरिश्चंद्र धोत्रे, विश्वजित देसाई, दिनकर पाटील, बाबासाे कोंडेकर उपस्थित होते.

सिलिंडर रिफीलिंगचा प्रकल्प कोल्हापुरातज्याद्वारे रोजगार मिळेल असे प्रकल्प आणले पाहिजेत, असे सांगत मंत्री पाटील यांनी लवकरच कोल्हापुरात सिलिंडर रिफीलिंगचा प्रकल्प येत असल्याचे सांगितले. शिवाय शेतीमधील टाकाऊ पदार्थांपासून इथेनॉलचा प्रकल्प आणण्याचा मानस असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

उद्या आयटीसाठी शंभर एकर जागा देतोकोल्हापूरच्या कोणत्या प्रश्नांना पहिल्यांदा प्राधान्य द्यायचे हे आपणाला ठरवावे लागेल असे सांगत कोल्हापुरातील आयटी पार्कमध्ये पुण्या-मुंबईच्या किती कंपन्या येणार आहेत याची यादी द्या, उद्या आयटी पार्कसाठी शंभर एकर जागा देतो, असे मंत्री पाटील यांनी सांगितले. यावर आयटी असोसिएशनचे शांताराम सुर्वे यांनी जिल्ह्यात ३५० आयटी कंपन्या कार्यरत असल्याचा मुद्दा मांडला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरITमाहिती तंत्रज्ञानministerमंत्रीchandrakant patilचंद्रकांत पाटील