शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील किणी टोलनाक्यावर टोल सुरुच राहणार, दरातही वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 18:06 IST

जिल्ह्यात नोंदणी असलेल्या व्यावसायिक वाहनांना पन्नास टक्के सवलत देण्यात येणार

संतोष भोसलेकिणी (कोल्हापूर) : पुणे बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील किणी (ता हातकंणगले )येथील टोल नाक्यावरील टोल वसुली वाढविण्यात  आलेली ५३दिवसाची  मुदत २४ जूनला संपत असल्याने महामार्ग व टोल नाका  राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणानाकडे   हस्तांतरीत होऊन टोल  वसुली सुरू राहणार आहे  तर टोल दरवाढ लागु करण्यात आली असून  कार जीप  साठी १० रूपये तर ट्रक बस अवघड वाहनांना १५ रूपये दरवाढ करत वाहनधारकांना धक्काच देण्यात आला आहे.बांधा वापरा या तत्वावर राज्य रस्ते विकास महामंडळाने महामार्गाचे  चौपदरीकरण करून २००५साली किणी व तासवडे (सातारा) येथे टोल नाके उभे करून टोल वसुली सुरू करण्यात आली होती . याची मुदत २ मे  २०२२ रोजी संपल्याने  कोरोना व महापूर व नोट बंदीच्या बंदच्या कालावधीसाठी ५३ दिवसाची मुदत वाढ देण्यात आली होती.या मुदतवाढीचा कालावधी २४ जुन रोजी संपणार आहे. राज्य रस्ते विकास महामंडळा कडून महामार्ग व टोल नाका राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरीत होणार असुन राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या वतीने टोल वसुली सुरू करण्यात ठेवण्यात येणार आहे.  तर टोल दरवाढ लागु करण्यात येणार असुन कार जीप साठी ८०रूपये ऐवजी ९०रूपये,  हालक्या वाहनासाठी १४५ रूपये तर ट्रक बस अवजड वाहनासाठी २८० रूपये ऐवजी ३०५ रूपये ची दर वाढ लागू करण्यात येणार आहे. तर तीन अॅक्सल वाहनधारकांना ३३५ रूपये, चार अॅक्सल वाहनधारकांना ४८०रूपये सात अॅक्सल वाहनधारकांना ५८५ रूपये टोल आकरणी होणार आहे.जिल्ह्यातील वाहनांना ५० टक्के सवलतजिल्ह्यात नोंदणी असलेल्या व्यावसायिक वाहनांना पन्नास टक्के सवलत देण्यात येणार आहे. तर   २४ तासात  रिटर्नच्या प्रवासासाठी दुप्पट ऐवजी दिडपट टोल द्यावा लागणार आहे तर  वीस किलोमीटर अंतरातील वाहनधारकांना ३१५मासिक पास सुविधा देणयात अली आहे. राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे महामार्गाचे  सहापदरीकरण करण्याचे प्रस्तावित आहे त्यासाठी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या वतीने  निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे मात्र प्रत्यक्षात सहापदरीकरणाच्य   कामाला पावसाळ्यानंतर सुरूवात होईल शक्यता आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्गtollplazaटोलनाका