कुरुंदवाड : तेरवाड (ता.शिरोळ) येथे उकळत्या दुधात पडून दोन वर्षीय चिमुकलीचा सोमवारी (दि. २) उपचाराच्या दरम्यान मृत्यू झाला. मंचरी ज्ञानेश्वर खोत (वय २ वर्षे, रा.लाटवाडी) असे चिमुकलीचे नाव आहे. २४ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली होती.याबाबत अधिक माहिती अशी, तेरवाड गावची यात्रा असल्याने पार्वती ज्ञानेश्वर खोत या मंचरीला घेऊन माहेरी आल्या होत्या. मंगळवारी यात्रेचा मुख्य दिवस असल्याने आई मंचरीला दूधभात चारून पाणी आणण्यासाठी स्वयंपाक घरात गेली. त्यांच्या पाठीमागून मंचरीही पळत जाऊन दूध उकळत असलेल्या भांड्यात पडल्याने गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी सांगली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर सोमवारी उपचार सुरू असतानाच चिमुकलीचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.वीस वर्षांनंतर फुललेलं स्पप्न अधुरंखोत दाम्पत्याला लग्नानंतर तब्बल वीस वर्षांनी नवसाने मुलगी झाली होती. त्यामुळे आजोळ आणि सासरी मंचरी लाडकी झाली होती. मात्र, नवसाने झालेल्या एकुलत्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत असून, आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे.
Web Summary : A two-year-old girl tragically died in Terwad, Kolhapur, after falling into a pot of boiling milk. The incident occurred while visiting her maternal home. The girl, born after 20 years of marriage, succumbed to her injuries during treatment, leaving her parents devastated.
Web Summary : कोल्हापुर के तेरवाड़ में दो साल की बच्ची उबलते दूध के बर्तन में गिर गई, जिससे उसकी दर्दनाक मौत हो गई। यह घटना उसके मायके में हुई। शादी के 20 साल बाद जन्मी बच्ची ने इलाज के दौरान दम तोड़ दिया, जिससे उसके माता-पिता सदमे में हैं।