शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

हद्दवाढ समर्थनार्थ आज मेळावा

By admin | Updated: September 3, 2016 00:55 IST

आंदोलनाची दिशा ठरवणार : धनंजय महाडिक, सतेज पाटील यांच्या उपस्थितीसाठी प्रयत्न

कोल्हापूर :  राज्य सरकारच्या भरवशावर शहर हद्दवाढीच्या मागणीसाठी आग्रही राहिलेल्या सर्वपक्षीय कृती समितीचा भ्रमनिरास झाल्यानंतर आता यापुढे कोणती भूमिका घ्यावी, यावर विचारविनियम करून आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी आज, शनिवारी दुपारी चार वाजता कोल्हापूर महानगरपालिकेत सर्वपक्षीय मेळावा घेण्यात येणार आहे. या मेळाव्यास खासदार धनंजय महाडिक व आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित राहावे म्हणून त्यांच्याशी संपर्क साधण्यात येत होता. परंतु, तो झाला नसल्याने त्यांच्या उपस्थितीबद्दल अनिश्चितता आहे. गेल्या ४५ वर्षांपासून शहराची हद्दवाढ रखडली आहे. सत्तेत आल्यानंतर हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापूरकरांना दिले होते. परंतु, हद्दवाढविरोधी कृती समितीचे आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक, आमदार सुजित मिणचेकर यांच्या विरोधामुळे हद्दवाढीच्या प्रस्तावाला बगल देत त्यांनी शहरालगतच्या गावांसाठी विकास प्राधिकरणाचा पर्याय दिला. सरकारमधील दोन्ही ज्येष्ठ मंत्र्यांनी अनपेक्षित ‘यु टर्न’ घेतल्याने शहरात तीव्र नाराजी उमटली आहे. हद्दवाढविरोधी कृती समितीने राज्य सरकारने दिलेल्या पर्यायाचे स्वागत केले असले तरी तो स्वीकारलेला नाही. सर्वपक्षीय शहर हद्दवाढ समितीने तर तो अमान्य केला आहे. त्यामुळे विकास प्राधिकरणाबाबत कमालीची संभ्रमावस्था आहे. म्हणूनच दोन्ही समित्यांच्या कार्यकर्त्यांनी मेळावे घेऊन जाहीर चर्चा करून पुढील दिशा ठरविण्याचे निश्चित केले आहे.सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांना निमंत्रणसर्वपक्षीय शहर हद्दवाढ कृती समितीने आज दुपारी चार वाजता महानगरपालिकेच्या ताराराणी सभागृहात मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यास सर्व पक्षांचे प्रमुख कार्यकर्ते, सर्व आजी-माजी महापौर, नगरसेवक यांना निमंत्रित करण्यात आले आहे. महानगरपालिकेत सत्तेत असलेल्या कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्यांना मेळाव्यास बोलविण्याचा विचार पुढे आल्यानंतर खासदार धनंजय महाडिक व आमदार सतेज पाटील यांना निमंत्रण देण्यासाठी संपर्क साधण्यात येत होता; पण तो झाला नाही. त्यामुळे ते मेळाव्याला येणार की नाही, हे रात्रीपर्यंत स्पष्ट झाले नव्हते. दरम्यान, मेळाव्यास मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थित राहावे, असे आवाहन महापौर अश्विनी रामाणे व माजी महापौर आर. के. पोवार यांनी केले आहे.