रसिकांवर ‘पथेर पांचाली’ची आजही जादू
By Admin | Updated: December 22, 2015 00:53 IST2015-12-22T00:33:35+5:302015-12-22T00:53:27+5:30
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव : दिवसभरात तेरा चित्रपट, चार लघुपट प्रदर्शित -- किफ्फी

रसिकांवर ‘पथेर पांचाली’ची आजही जादू
कोल्हापूर : चित्रमहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटी आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्यावतीने आयोजित चौथा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव राजर्षी शाहू महाराज स्मारक भवन येथे सुरू आहे. सोमवारी, तेरा चित्रपट आणि चार लघुपट दाखविण्यात आले. सत्यजित रे दिग्दर्शित १९५५ मधील ‘बेस्ट ह्युमन डॉक्युमेंट’ म्हणून गौरविलेला बंगाली चित्रपट ‘पथेर पांचाली’ चौथ्या दिवसाचे आकर्षण ठरला. सत्यघटनेवर आधारित आधुनिक चित्रपट ‘स्पाईस’ व ‘ग्लिस्ट्रप’ या डॅनिश इतिहासातील दोन कुप्रसिद्ध व्यक्ती मादक द्रव्यांच्या माध्यमातून स्वातंत्र्याचा अर्थ मांडतात. त्याचे चित्रण क्रिस्तोफर बोयी या डेन्मार्क च्या दिग्दर्शकाने ‘सेक्स, ड्रग अँड टॅक्सेशन’ या चित्रपटात केले आहे.दुसऱ्या महायुद्धावेळच्या म्हणजेच १९३८ च्या काळातील हिटलरच्या हुकुमशाहीत जगणाऱ्या जर्मनीतील एका सर्वसामान्य कुटुंबाची कहाणी ‘द बुक थीफ’ या चित्रपटात ब्रायन पर्सिवल या अमेरिकन दिग्दर्शकाने मांडली आहे. गरिबी माणसाला कधी विचार करायला शिकविते तर कधी बधीर करून टाकते, कधी घडवते तर कधी बिघडवते. अशाच एका गरिबीत दिवस काढणाऱ्या आई आणि तिच्या मुलाच्या आयुष्याची गोष्ट अभिनेते-दिग्दर्शक मिलिंद शिंदे यांनी ‘भिडू’ या मराठी चित्रपटातून दाखविली आहे. दुष्काळाच्या सावटाखाली जगणाऱ्या एका कुटुंबाची कहाणी कर्त्या व्यक्तीला आत्महत्येपासून परावृत्त करणारे मुलाचे प्रेम अशा एका सकारात्मक दृष्टिकोनातून मकरंद माने या दिग्दर्शकाने ‘रिंगण’ हा चित्रपट बनविला आहे.प्राचीन व गाजलेल्या श्रेष्ठ कलाकृतींच्या लिलाव क्षेत्रातील गुप्त घडामोडी, चालणारे व्यवहार आदी बाबींवर दिग्दर्शक गुसेपी टोरनॅटोर या इटालियन चित्रपट दिग्दर्शकाने ‘द बेस्ट आॅफर’ या चित्रपटाच्या माध्यमातून मांडला आहे. खाण्या-पिण्याच्या भिन्न आणि चुकीच्या सवयीमुळे एका कुटुंबात झालेल्या उलथापालथीची क था म्हणजे सिमोन ब्रॉस या दिग्दर्शकाचा ‘बॅड’ हॅँबिटस हा चित्रपट होय. एका चित्रपट दिग्दर्शकाचा सिनेक्षेत्रातील प्रवास दिग्दर्शक गुसेपी टोरनॅटोरने ‘सिनेमा पॅराडिसो’ या चित्रपटातून उलगडला आहे. जर्मन दिग्दर्शक बनेडिक फिलेगॉफ यांचा ‘वोंब’, बंगाली दिग्दर्शक सोविक मित्रा यांचा ‘पुनश्च’, साऊथ आफ्रिकन दिग्दर्शक सालमन डी जागेर यांचा ‘फ्री स्टेट डेन्मार्क’, दिग्दर्शक सुझेन बायर यांचा ‘इन अ बेटर वर्ल्ड’, मेक्सिकन दिग्दर्शक लुईस मंडोकी यांचा ‘इनोसंट व्हायसेस’ आदी चित्रपट दाखविले.
आजचे चित्रपट :
स्क्रीन नं. १ : सकाळी ९.३० वाजता- कु र्मावतार (कन्नड), दुपारी १२ वाजता-हुश्य ! गर्ल्स डोंट स्क्रीम (इराण), दुपारी २.३० वाजता-बधशाला (नेपाळ), सायंकाळी ६.३०- पिंडदान (मराठी), रात्री ९ वाजता-साकव (मराठी).
स्क्रीन नं. २ : सकाळी ९.३० वाजता - अॅवालॉन (स्वीडन), दुपारी १२ वाजता - द बेट कलेक्टर (फिलिपाईन्स), दुपारी २.३० वाजता- चॅप्लिन (यु.एस.ए.), रात्री ९ वाजता - मिस्टर अॅँड मिसेस ५५ (हिंदी).
स्क्रीन नं. ३ : सकाळी ९.३० वाजता - अ प्युअर फॉरमॅँलिटी (इटली), दुपारी १२ वाजता - घटश्राद्ध (कन्नड), दुपारी २.३० वाजता - इंडियन पनोरामा/ लघुपट (किस्सा ए पार्सी / एक होता काऊ / थ्री डॉटस / प्लेइंग द टार, सायंकाळी ६.३० - इंडियन पनोरामा/ लघुपट (वुई कम फ्रॉम फार अवे)