तात्यासाहेब कोरे यांचा आज २६ वा स्मृतिदिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:38 IST2020-12-13T04:38:51+5:302020-12-13T04:38:51+5:30
वारणानगर : वारणा परिसराचे भाग्यविधाते, सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांचा आज, रविवारी २६ वा स्मृतिदिन असून वारणा उद्योग व शिक्षण ...

तात्यासाहेब कोरे यांचा आज २६ वा स्मृतिदिन
वारणानगर : वारणा परिसराचे भाग्यविधाते, सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांचा आज, रविवारी २६ वा स्मृतिदिन असून वारणा उद्योग व शिक्षण समूहाच्या वतीने प्रातिनिधीक स्वरूपात सद्भावना दौड व समाधीपूजन असा कार्यक्रम आयोजित केला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचे मैदान, कृषी प्रदर्शन यासारखे सर्वच कार्यक्रम रद्द केले आहेत. परंपरा खंडित होऊ नये म्हणून वारणा समूहातील संस्थातून स्मृतीज्योत प्रज्वलित करून तात्यासाहेब यांच्या समाधिस्थळावर परंपरेप्रमाणे आणण्यात येणार आहे. तात्यासाहेब कोरेनगर येथे वारणा दूध संघामार्फत रविवारी सकाळी ९ वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. परिसरातील कार्यकर्त्यांनी रविवारी वारणानगरला न येता गावातच विविध संस्थांमध्ये तात्यासाहेब कोरे यांच्या प्रतिमेचे पूजन करावे, असे आवाहन आमदार डॉ. विनय कोरे यांनी केले आहे.
१२सहकारमहर्षि तात्यासाहेब कोरे