शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

 तंबाखूविरोधी दिन :  कर्करोगाचे ६० टक्के रुग्ण तंबाखू खाणारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 11:48 IST

तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे देशात दरवर्षी नऊ लाखांहून अधिक रुग्ण दगावत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातही कर्करोग झालेल्या एकूण रु ग्णांपैकी ६० टक्के रुग्ण केवळ तंबाखूजन्य पदार्थ खाणारे आहेत. त्यामुळे तंबाखू, गुटखा हे विष असूनही लोक केवळ व्यसन म्हणून जवळ करीत आहेत. ज्यांनी गुटखा, तंबाखू सोडून तीन ते चार वर्षे झाली, अशांना कॅन्सर होण्याचे प्रमाण वाढले आहे.

ठळक मुद्दे तंबाखूविरोधी दिन :  कर्करोगाचे ६० टक्के रुग्ण तंबाखू खाणारेतंबाखू खाणे सोडलेल्या रुग्णांनीही करून घ्यावी मौखिक चाचणी

कोल्हापूर : तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे देशात दरवर्षी नऊ लाखांहून अधिक रुग्ण दगावत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातही कर्करोग झालेल्या एकूण रु ग्णांपैकी ६० टक्के रुग्ण केवळ तंबाखूजन्य पदार्थ खाणारे आहेत. त्यामुळे तंबाखू, गुटखा हे विष असूनही लोक केवळ व्यसन म्हणून जवळ करीत आहेत. ज्यांनी गुटखा, तंबाखू सोडून तीन ते चार वर्षे झाली, अशांना कॅन्सर होण्याचे प्रमाण वाढले आहे.तंबाखूजन्य विशेषत: गुटखा खाऊन कर्करोग झालेल्या रुग्णांची संख्या राज्यासह देशभरात झपाट्याने वाढू लागली आहे. यात गुटखा खाणाऱ्यांचे प्रथम गालाचे स्नायू आखडणे, त्यानंतर आतील त्वचेला चट्टे पडणे, तोंड उघडण्यात अडचणी येणे, संवेदना समजण्याची क्षमता कमी होणे, त्वचा लालसर होणे, त्वचा पांढरी पडणे, त्यानंतर तोंडातील त्वचेला जखम होणे ही कर्करोगाची प्राथमिक लक्षणे आहेत. असे रुग्ण कर्करोग तज्ज्ञांकडे वाढू लागले आहेत.

अनेक जणांचा कर्करोग अंतिम टप्प्याकडेही पोहोचत आहे. अशा रुग्णांचा तो अवयव काढून टाकण्याशिवाय पर्याय राहत नाही. तरीही लोक गुटखा, मावा, तंबाखू खाण्यात धन्यता मानत आहेत. विशेष म्हणजे विविध कर्करोगाच्या रुग्णांपैकी तंबाखू खाऊन कर्करोग झालेल्या रुग्णांची संख्या ६० टक्क्यांवर पोहोचली आहे. त्यामुळे ‘तंबाखूविरोधी अभियान’ ही एक चळवळ म्हणून सर्वसामान्यांनी राबविणे काळाची गरज बनली आहे.

कर्करोगाबरोबर हेही रोग फ्रीतंबाखूजन्य पदार्थ खाण्यामुळे कर्करोग तर हमखास होतोच. त्यासोबत भूक मंदावणे, हृदयरोगाचा झटका, मेंदूला सातत्याने उत्तेजना दिल्यामुळे विसरभोळेपणा, मानसिक थकवा, आकलनशक्ती कमी होणे, एकाग्रता नष्ट होणे, चिडचिडेपणा येणे, अकाली वृद्धत्व येणे, त्वचेला कोरडेपणा येणे, आदी रोगही होऊ शकतात.

तोंडाचे स्कॅनिंग करून घेणे आवश्यकमी तीन वर्षांपूर्वी, तर मी चार वर्षांपूर्वी तंबाखू, गुटखा सोडला असे म्हणणारी अनेक मंडळी दिसतात. अशा रुग्णांनाही कर्करोग होण्याचे प्रमाण वाढले आहे. कारण तोंडातील त्वचेच्या पेशी गुटखा, तंबाखू सातत्याने खाल्ल्यामुळे वर्षभरातच खराब होण्यास सुरुवात होते. त्यामुळे अशा रुग्णांनीही ‘वेलेस्कोप’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त यंत्राद्वारे तोंडाचे स्कॅनिंग करून घेणे आवश्यक बाब बनली आहे. याद्वारे अशा तंबाखू खाणाऱ्या रुग्णांना पुढे कर्करोग होणार की नाही हेही समजते.

कर्करोग पुढच्या पायरीवर गेल्यानंतर होणारा मनस्ताप रोखण्यासाठी तंबाखू खाणाऱ्या लोकांनी तज्ज्ञांकडून मौखिक तपासणी करून घेणे गरजेचे आहे. सरकारने जनजागृतीसाठी पानमसाल्याच्याही जाहिराती बंद केल्या पाहिजेत.- डॉ. अशितोष देशपांडे,सचिव, इंडियन डेंटल असोसिएशन, शाखा कोल्हापूर 

 

टॅग्स :Healthआरोग्यkolhapurकोल्हापूर