शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Policy Meeting Updates: खूशखबर! ईएमआयचा भार होणार कमी, सामान्यांना मोठा दिलासा, रेपो दरात ०.२५ टक्क्यांची कपात
2
भाजपापाठोपाठ उद्धव ठाकरेंचाही शिंदेसेनेला दणका, तर राज ठाकरे दिल्ली दौऱ्यावर; २ दिवसात काय घडलं?
3
आरबीआयचा रेपो दर ठरवतो तुमचे EMI आणि आर्थिक गणित! कर्ज महाग होणार की स्वस्त? सोप्या भाषेत
4
IndiGo: विमान रद्द झाल्याचं कळवलं नाही, राहण्याचीही सोय नाही; इंडिगोच्या प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक!
5
"अमेरिका गेम करतेय, तुमच्यासोबत अन् आमच्यासोबतही..."; एक फोन कॉल लीकनंतर युरोप अमेरिकेत खळबळ
6
'रोलेक्स'ला जगभरात इतकी मागणी का? ४-५ वर्षांचा वेटींग पीरियड? ९९% लोकांना कारण माहिती नसेल
7
Rupee Fall Reason Explained: रुपया घसरण्याचे नेमके कारण काय?
8
आणखी ३० टक्क्यांपर्यंत महाग होऊ शकतं सोनं; 'या' कारणामुळे येऊ शकते जोरदार तेजी, कोणी केली भविष्यवाणी?
9
असीम मुनीर आयुष्यभर वर्दीवरच राहतील, कधीच अटक होणार नाही; पाकिस्तान सैन्याचे सीडीएफ म्हणून नियुक्ती
10
इंडिगोची ५५० उड्डाणे रद्द, DGCA ची कारवाई; नियोजनात मोठी चूक, विमान कंपनीने माफी मागितली
11
वय वर्षे १२४! ठाण्याचे मनोरुग्णालय होणार आता ‘मॉडर्न’; ३,२७८ बेडची व्यवस्था, अद्ययावत किचन आणि २४×७ कॅन्टीन सुविधा  
12
सायको पूनम! २ वर्षांत ४ चिमुकल्यांचा जीव घेतला; पोटच्या पोरालाही सोडलं नाही, चौकशीत गूढ उकळलं
13
महायुतीत तणाव! "फाटाफूट कराल तर स्वतंत्र निवडणूक लढू..."; शिंदेसेनेचा थेट युती तोडण्याचा इशारा?
14
Sonu Nigam Property Deal: सोनू निगमनं मुंबईत रेंटवर दिली प्रॉपर्टी, महिन्याचं भाडं पाहून अवाक् व्हाल; डिपॉझिट म्हणूनच मिळाले ९० लाख
15
आजचे राशीभविष्य, ५ डिसेंबर २०२५: सरकार विरोधी कामे, राग यापासून दूर राहणे हितावह राहील
16
कल्याण-डोंबिवलीमध्ये पक्षप्रवेशाचा घोडेबाजार तेजीत, शिंदेसेना-भाजपचे एकमेकांवर पैशांच्या आमिषाचे आरोप
17
"स्वत: काहीही साध्य केलं नाही, ते रोहित- विराटचं भविष्य ठरवतात" Harbhajan Singh भडकला!
18
रुपया रडविणार, खिसा रिकामा करणार! महागाईचा फटका सामान्यांना बसणार; निर्यातदारांना मात्र फायदा
19
व्लादिमीर पुतिन भारत भेटीवर; ८ दशकांची रशियासोबतची मैत्री होणार दृढ, जगाचे असणार लक्ष
20
जगभर: माजी राष्ट्राध्यक्षांच्या मुलीने दिला खासदारकीचा राजीनामा, रशिया-युक्रेन युद्धाशी कनेक्शन काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या अंबाबाईला तिरुपती देवस्थानचा शालू अर्पण, शालूची किंमत किती..जाणून घ्या

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: October 18, 2023 14:11 IST

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडील ओटीही अंबाबाईला अर्पण

कोल्हापूर : नारंगी रंग, त्यावर सोनेरी जरीकाठ आणि बुट्ट्यांचा सुंदर शालू बुधवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईला अर्पण करण्यात आला. तिरुमला तिरुपती देवस्थानच्या वतीने दरवर्षी नवरात्रोत्सवानिमित्त आदिशक्ती आणि देशातील ५१ शक्तिपीठांतील देवता असलेल्या अंबाबाईला आईच्या भावनेतून शालू अर्पण केला जातो.विष्णूवर रागावून श्री लक्ष्मी कोल्हापुरात आपली आई आदिशक्ती अंबाबाईकडे आली. अंबाबाईच्या कृपेमुळे विष्णूला तिरुमला तिरुपती येथे पत्नी लक्ष्मी भेटली, अशी या क्षेत्राची महिमा आहे. त्यामुळे दरवर्षी तिरुपती देवस्थानच्या वतीने अंबाबाईला नवरात्रोत्सवात मानाचा शालू अर्पण केला जातो.आज, बुधवारी सकाळी १० वाजता पारंपरिक वाद्यांच्या गजरात तिरुपती देवस्थानचे सदस्य मिलिंद नार्वेकर, राजेशकुमार शर्मा यांनी अंबाबाईला शालू अर्पण केला. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने सचिव सुशांत बनसोडे यांच्याकडे शालू सुपुर्द करण्यात आला.यावेळी तिरुपती देवस्थानचे समन्वयक के. रामाराव, मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे, सहसचिव शीतल इंगवले यांच्यासह देवस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.शालू लाखमोलाचा..नारंगी रंगाचा व सोनेरी काठाच्या या शालूची किंमत १ लाख ६ हजार ५७५ इतकी आहे. या शालूसोबतच मिलिंद नार्वेकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडील ओटीही अंबाबाईला अर्पण केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरNavratriनवरात्रीMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरtirupati balaji mandirतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाट