टायर फुटून दुचाकी दुभाजकाला धडकली; तरुण उद्योजक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 01:13 IST2019-04-01T01:13:19+5:302019-04-01T01:13:24+5:30

कसबा बावडा : भरधाव मोटारसायकलचा टायर फुटून गाडी दुभाजकावर आदळल्यामुळे बावड्यातील तरुण उद्योजकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी ...

Tire split bikes to two-wheeler; Killed young businessmen | टायर फुटून दुचाकी दुभाजकाला धडकली; तरुण उद्योजक ठार

टायर फुटून दुचाकी दुभाजकाला धडकली; तरुण उद्योजक ठार

कसबा बावडा : भरधाव मोटारसायकलचा टायर फुटून गाडी दुभाजकावर आदळल्यामुळे बावड्यातील तरुण उद्योजकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास शिये टोलनाका ते तस्ते ओढ्यादरम्यान घडली. राहुल कृष्णा चौगले (वय ३०, रा. प्रिन्स शिवाजी शाळेजवळ, कसबा बावडा) असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी, राहुल चौगले याचे औद्योगिक वसाहतीत छोटेसे वर्कशॉप आहे. नेहमीप्रमाणे तो आपल्या वर्कशॉपकडे जात होता. शिये टोलनाक्याच्या पुढे काही अंतर गेल्यानंतर त्याच्या मोटारसायकलचा टायर फुटला व मोटारसायकल रस्त्याच्या दुभाजकावर धडकली.
ही धडक इतकी जोरात होती की, गाडी काही अंतर पुढे जाऊन त्याच्या डोक्यास जबरदस्त मार बसला. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी यावेळी रुग्णवाहिकेस फोन करून तातडीने त्याला सीपीआरमध्ये हलविले.
राहुल विवाहित होता. त्याला एक लहान मुलगा आहे. त्याच्या कुटुंबीयांचा शेती व्यवसाय आहे. चार वर्षांपूर्वी त्याने शिरोली एमआयडीसी येथे छोटासा कारखाना उभारला होता. अपघात होताच त्याच्या मित्रांनी व नातेवाइकांनी त्याच्या घरी व सीपीआरमध्ये गर्दी केली होती. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

Web Title: Tire split bikes to two-wheeler; Killed young businessmen