शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
2
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी...', अजित पवार यांचं विधान
3
"कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र
4
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
5
नाशिकमध्ये ठाकरे गटात बंड होणार! एक नेता दीड वर्षापासून तयारी करतोय, अर्ज घेतला
6
किंग खान King Kohli ला म्हणाला 'जावई', अनुष्का-विराटच्या नात्याचा शाहरुख होता साक्षीदार
7
काँग्रेसमध्ये राज्यात ऐक्याचे चित्र, एकमेकांच्या पाडापाडीला फाटा; आपापले सुभे सांभाळण्यावर भर
8
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
9
महाराष्ट्र दिनानिमित्त नरेंद्र मोदींचं मराठमोळं ट्विट; "परंपरा, प्रगती आणि एकता..."
10
वातावरण टाइट ! साखर पेरणी की जातीचा मुद्दा ? 'शेट्टी-सरुडकर-माने' यांच्यामध्येच फाइट
11
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
12
Mutual Fund मधील इन्सायडर ट्रेडिंग काय आहे माहितीये? ज्यावर SEBIनं उचलली कठोर पावलं, जाणून घ्या
13
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
14
१०० वर्षांपेक्षा जुना इतिहास, Reliance इतकं मार्केट कॅप... Covishield लस तयार करणाऱ्या कंपनीची कहाणी
15
‘समृद्ध आणि बलशाली महाराष्ट्र घडवूया’, महाराष्ट्र दिनी राज्यपाल रमेश बैस यांचं आवाहन
16
मुंबईत आगळा सामना! मुलाविरुद्ध प्रचार करणार वडील;रवींद्र वायकरांसाठी गजानन कीर्तिकर उतरणार मुलगा अमोलविरोधात प्रचारात
17
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा
18
Success Story : स्कूल ड्रॉपआऊट, जे बनले देशातील सर्वात श्रीमंत ज्वेलर; देश-विदेशात पसरलाय व्यवसाय
19
आरक्षण, घटनेवर खोटा प्रचार सुरू; ४०० हून अधिक जागा जिंकणार : गृहमंत्री शाह
20
VIDEO : महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंचं रिल, महाराष्ट्रातील जनतेला केलं विशेष आवाहन

मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दुसऱ्याकडे देण्याची वेळ, चंद्रकांत पाटलांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2022 2:10 PM

शिवसेनेला हे कळत नाही की त्यांना संपवण्याचा एक प्लॅन चालला आहे. त्यामध्ये तुम्ही फसत चालला आहात असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

कोल्हापूर : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पुन्हा शिवसेनेवर हल्लाबोल चढवला. यावेळी तर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आता दुसऱ्याकडे देण्याची वेळ आल्याचे मत व्यक्त केले आहे. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देताना ते कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध मुद्यावरुन मुख्यमंत्री ठाकरे तसेच शिवसेनेवर स्पष्ट शब्दात भाष्य केले.यावेळी बोलताना पाटील म्हणाले, शत्रू जरी असला तरी आपण त्याच्या तब्येतीबद्दल त्याला शुभेच्छा देतो. उद्धव ठाकरे तर आमचे मित्र आहेत. मात्र राज्यावर कोरोनाचे संकट आहे. या संकटावर मात करण्यासाठी पंतप्रधानांनी बैठक घेतली. मात्र, या बैठकीला मुख्यमंत्री गैरहजर राहिले. त्यांची प्रकृती बरी नाही हे जरी खरे असले तरी राज्यात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्यांची जबाबदारी मुख्यमंत्र्यावर असते. त्यामुळे त्यांची तब्येत ठिक नसेल तर त्यांनी आपला चार्ज कोणाकडे तरी दिली पाहिजे.कोरोना पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं एकच म्हणणं आहे की पोटावर पाय आणून निर्बंध लादू नका. महत्वपूर्ण निर्णय करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रत्यक्ष उपलब्ध नाहीत. मुख्यमंत्री म्हणजे उठणे, जाणे, भेटणे, चर्चा करणे, लोकांमध्ये विश्वास निर्माण करणे असं आहे. “मी तुमच्या तब्येतीबाबत परमेश्वराकडे प्रार्थना करतो की लवकर हे बरे व्हावेत. परंतु तोपर्यंत कोणीतरी तुमच्यावतीने मुख्यमंत्री म्हणून… कारण मुख्यमंत्री या शब्दात अर्थ आहे. मुख्यमंत्री या शब्दात ताकद आहे, त्यामुळे तो लागेल आणि तो कोण असावा ते तुम्हीच ठरवायचं आहे.” असंही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवलं.शिवसेनेला संपवण्याचा एक प्लॅन मुंबै बँक अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडीवर बोलताना त्यांनी राष्ट्रवादी शिवसेनेला कस संपवत आहे यावरही भाष्य केले. राष्ट्रवादीने चेअरमन पद पदरात पाडून घेतले, शिवसेनेचा व्हाईस चेअरमन पडला? हे कसं झालं? आता हे शिवसेनेला हे कळत नाही की तुम्हाला पूर्णपणे संपवण्याचा एक प्लॅन चालला आहे. त्यामध्ये तुम्ही फसत चालला आहात असेही ते म्हणाले. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार प्रसाद लाड यांचा पराभव झाला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरUddhav Thackerayउद्धव ठाकरेchandrakant patilचंद्रकांत पाटीलShiv Senaशिवसेना