शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नरेंद्र मोदींनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 13:48 IST

गेल्या पाच वर्षांमध्ये आम्ही मूलभूत सुविधांसाठी काम केले. आता २०१९ ते २०२४ हा कालावधी आकांक्षापूर्तीचा असेल, अशी स्पष्ट ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. गुरुवारी त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देशभरातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

ठळक मुद्देपुढील पाच वर्षे आकांक्षापूर्तीची नरेंद्र मोदींनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद

कोल्हापूर : गेल्या पाच वर्षांमध्ये आम्ही मूलभूत सुविधांसाठी काम केले. आता २०१९ ते २०२४ हा कालावधी आकांक्षापूर्तीचा असेल, अशी स्पष्ट ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. गुरुवारी त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देशभरातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला.येथील जयलक्ष्मी सांस्कृतिक सभागृहामध्ये दुपारी साडेबारानंतर या संवाद उपक्रमाला सुरुवात झाली. देशभरातील विविध राज्यांतील प्रमुख शहरांमधील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना यामध्ये प्रश्न विचारण्याची मुभा दिली होती. महाराष्ट्रातील पुण्यातील कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. कोल्हापूर शहरातील कार्यकर्त्यांनी हा संवाद ऐकण्यासाठी गर्दी केली होती.वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तर देताना मोदी म्हणाले, प्रत्येक कार्यकर्त्याने किमान दहा घरांच्या संपर्कात राहावे. त्यांना सरकारच्या विविध योजनांची माहिती द्यावी. मी स्वत: जेव्हा ‘आयुष्यमान भारत’मधील लाभार्थ्यांशी बोलतो तेव्हा मलाच त्यांच्याकडून प्रेरणा मिळते.राष्ट्रनिर्माणाच्या कार्याचा विचार करता, प्रत्येकाने आपले काम प्रामणिकपणे करणे महत्त्वाचे ठरते. देश आता नव्या नीतीने आपल्या क्षमतांचा विस्तार करीत आहे. आम्ही सत्तेवर आलो तेव्हा आपली अर्थव्यवस्था ११ व्या क्रमांकावर होती. ती आता सहाव्या क्रमांकावर आली आहे. पुढील काळात ती पहिल्या तीनमध्ये आणण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे.यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, शहराध्यक्ष संदीप देसाई, आर. डी. पाटील, अशोक देसाई, अ‍ॅड. संपतराव चव्हाण, महानगरपालिकेतील गटनेते विजय सूर्यवंशी, नगरसेवक आशिष ढवळे, अजित ठाणेकर, जयश्री जाधव, चंद्रकांत घाटगे, अमित पालोजी, हेमंत आराध्ये, दिलीप मेत्राणी, शंतनू मोहिते यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीkolhapurकोल्हापूर