शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

लाचप्रकरणी सहायक मोटार वाहन निरीक्षकास तीन वर्षे शिक्षा, खासगी एजंटालाही कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 11:53 IST

ट्रॅक्स वाहनावर कारवाई न करण्यासाठी १० हजार रुपयांच्या लाचप्रकरणी आर. टी. ओ. सुपे पोस्ट (चंदगड)चे तत्कालीन सहायक मोटार वाहन निरीक्षक प्रशांत बाळासाहेब शिंदे (रा. कोल्हापूर) व त्यांचा खासगी एजंट समीर रवळनाथ शिनोळकर (रा. यशवंतनगर, ता. चंदगड) यांना प्रत्येकी तीन वर्षे सक्षम कारावासाची शिक्षा सुनावली.

ठळक मुद्देलाचप्रकरणी सहायक मोटार वाहन निरीक्षकास तीन वर्षे शिक्षा, खासगी एजंटालाही कारावास ट्रॅक्सवर कारवाई न करण्याबाबत मागितली १० हजारांची लाच

कोल्हापूर : ट्रॅक्स वाहनावर कारवाई न करण्यासाठी १० हजार रुपयांच्या लाचप्रकरणी आर. टी. ओ. सुपे पोस्ट (चंदगड)चे तत्कालीन सहायक मोटार वाहन निरीक्षक प्रशांत बाळासाहेब शिंदे (रा. कोल्हापूर) व त्यांचा खासगी एजंट समीर रवळनाथ शिनोळकर (रा. यशवंतनगर, ता. चंदगड) यांना प्रत्येकी तीन वर्षे सक्षम कारावासाची शिक्षा सुनावली.

ही शिक्षा गडहिंग्लज येथील विशेष न्यायालयाचे न्यायाधीश तथा अप्पर जिल्हा न्यायाधीश अनिरुद्ध प्रतिनिधी यांनी सुनावली. सरकारतर्फे सहायक सरकारी वकील सुनील तेली यांनी काम पाहिले; यासाठी आकाश उदय घोरपडे (रा. शिनोळी, ता. चंदगड) यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.याबाबत मिळालेली माहिती अशी की, आकाश घोरपडे यांचा ट्रॅक्स वाहनाचा व्यवसाय आहे. या वाहनावर कारवाई न करण्यासाठी तत्कालीन सहायक मोटार वाहन निरीक्षक प्रशांत बाळासाहेब शिंदे (रा. कोल्हापूर) यांनी १० हजार रुपयांची लाच मागितली होती; त्यासाठी आरोपी समीर शिनोळकर या खासगी एजंटाला वापरले होते; त्यामुळे तक्रारदार आकाश घोरपडे यांनी दि. २२ एप्रिल २०१५ रोजी प्रशांत शिंदे यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.या खटल्यामध्ये फिर्यादी घोरपडे यांनी न्यायालयासमोर सबळ पुरावे मांडले; त्यामुळे विशेष न्यायालयाने प्रशांत शिंदे व खासगी एजंट समीर शिनोळकर यांना दोषी ठरवून प्रत्येकी तीन वर्षे सश्रम कारावास व १५ हजार रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास तीन महिने जादा साधी कैद अशी शिक्षा सुनावली. सरकारतर्फे गडहिंग्लज अतिरिक्तसरकारी अभियोक्ता सुनील तोली यांनी काम पाहिले. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक उदय आफळे यांनी केला. 

 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसCrime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर