शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ला; ९ निष्पाप बालकांसह १० जणांचा मृत्यू
2
'जुबिन गर्ग यांची हत्या झाली!'; आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचा सिंगापूर मृत्यू प्रकरणावर धक्कादायक दावा
3
IND vs SA 2nd Test : द.आफ्रिकेनं ठेवलं अशक्यप्राय लक्ष्य! टीम इंडियासमोर सामना वाचवण्याचं आव्हान
4
“मार्च २०२६ पासून मीरा–भाईंदरला पूर्ण क्षमतेने सूर्या योजनेचा जल पुरवठा सुरू होणार”: सरनाईक
5
धक्कादायक! 'गुप्त रोग' बरे करण्याच्या नावाखाली भोंदू बाबाने ४८ लाखांना फसवलं; इंजिनीअरची किडनीही फेल 
6
हाय-डिमांड नोकऱ्यांची लिस्ट आऊट! या २५ फील्डमध्ये पडणार पगाराचा जोरदार पाऊस!
7
महानगरपालिका प्रारुप मतदार याद्यांच्या हरकतीची मुदत वाढवा; काँग्रेसचे निवडणूक आयोगाला पत्र
8
सेलिना जेटलीचा पतीवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप, ५० कोटींसह मागितला घटस्फोट
9
"हा केवळ ध्वज नाही तर,..." राम मंदिराच्या शिखरावर भगवा फडकावल्यानंतर PM Modi म्हणाले...
10
"सरकार कोणाचेही असो, मानसन्मान पाळायलाच पाहिजे"; सुप्रिया सुळेंची CM-DCM वर टीका
11
12000 वर्षांनी Hayli Gubbi ज्वालामुखी खवळला; सॅटलाईटने टिपली उद्रेक होतानाची भयावह दृश्ये
12
दत्त जयंती २०२५: गुरुचरित्र सप्ताह कधीपासून सुरू करावा? पाहा, मान्यता, महत्त्वाच्या गोष्टी
13
शेअर बाजारात इतिहासातील सर्वात मोठी घसरण होणार, दिग्गजानं केली भविष्यवाणी; म्हटलं, "गुंतवणूकदारांना आपली संपत्ती..."
14
मालेगावनंतर बीड हादरले! साडेपाच वर्षांच्या मुलीवर नात्यातील मुलाचा अत्याचार, ४ दिवस वेदनेत
15
उबर कंपनीत परप्रांतीय आणि स्थानिक चालकांमध्ये भेदभाव? ड्रायव्हर्सचे कार्यालयाबाहेर आंदोलन
16
आजचा दिवस संकल्पपूर्तीचा; शांती पसरवणारा, समृद्धी देणारा भारत स्थापन करूया- मोहन भागवत
17
सासूने थिनर आणले अन् पतीने पेटवून दिले; चार्जशीटमध्ये झाला निक्की भाटी हत्या प्रकरणाचा मोठा खुलासा
18
IND vs SA 2nd Test : दुसरे सत्रही दक्षिण आफ्रिकेच्या नावे; ५०० पेक्षा अधिक धावांची आघाडी घेतली, तरी...
19
"तिजोरी तुमच्याकडे असली तरी ‘तिजोरी’चा मालक आमच्याकडे"; चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना टोला
20
"सोहम माझा मित्र...", मंजिरीच्या खऱ्या आयुष्यातील होणाऱ्या नवऱ्याला 'राया'ने दिला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: तक्रार मागे घेण्यासाठी मागितली पाच लाखांची खंडणी, तीन महिलांसह अल्पवयीन मुलास घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 13:40 IST

डमी नोटांचे बंडल

कोल्हापूर : लैंगिक शोषण आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा मागे घेण्यासाठी पाच लाखांच्या खंडणीची मागणी करणाऱ्या तीन महिलांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. या टोळीतील एक तरुण पळून गेला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने बुधवारी (दि. ८) रात्री मध्यवर्ती बसस्थानकासमोर सापळा रचून कारवाई केली.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, निगवे दुमाला (ता. करवीर) येथील गणेश मारुती एकशिंगे (वय ३०) याच्यावर मंगळवारी (दि. ७) लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात लैंगिक शोषण आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी त्याला अटक झाली आहे. अटकेनंतर पीडित महिलेसह तिचा मित्र नेताजी शिंदे याने गणेश याचे वडील मारुती एकशिंगे यांना फोन केला. तुमच्या मुलाच्या विरोधातील तक्रार मागे घेतो. यासाठी पाच लाख रुपये द्यावे लागतील, असे त्यांनी सांगितले. चर्चेअंती तीन लाखांवर तडजोड झाली. मात्र, पैसे देण्याची इच्छा नसल्याने मारुती एकशिंगे यांनी पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांची भेट घेऊन खंडणी मागणीची तक्रार केली. याबाबत अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला पडताळणी करून कारवाई करण्याचा आदेश दिला.पोलिस निरीक्षक कळमकर यांच्या सूचनेनुसार सहायक पोलिस निरीक्षक सागर वाघ आणि स्वाती यादव यांच्या पथकांनी मध्यवर्ती बसस्थानकासमोर सह्याद्री हॉटेलबाहेर सापळा रचून पीडित महिला आणि तिच्या मित्राला खंडणीचे पैसे घेण्यासाठी बोलवले. पैसे स्वीकारताना तीन महिलांसह एका अल्पवयीन मुलाला रंगेहाथ पकडले. न्यायालयात हजर केले असता तीन महिलांना दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. खंडणीची मागणी करणारा नेताजी शिंदे पळून गेला. त्याचा शोध सुरू आहे.डमी नोटांचे बंडलमारुती एकशिंगे यांच्याकडे खंडणी देण्यासाठी पैसे नव्हते. त्यावर उपाय म्हणून सहायक पोलिस निरीक्षक वाघ यांनी डमी नोटा घेऊन बंडलच्या दोन्ही बाजूला ५०० रुपयांच्या दोन खऱ्या नोटा लावल्या. असे सहा बंडल तयार करून खंडणीची रोकड तयार केली. १२ हजार रुपयांच्या रोकडसह ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.शिकारीच अडकले जाळ्यातलैंगिक शोषण आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून खंडणी उकळण्याचा कट टोळीने रचला होता. मात्र, मारुती एकशिंगे यांनी पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन वस्तुस्थिती सांगितली. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईत खंडणी उकळणाऱ्या टोळीचा भांडाफोड झाला. शिकार करण्याच्या प्रयत्नातील शिकारीच जाळ्यात अडकल्याची माहिती पोलिसांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Extortion bid for withdrawal of complaint, three women arrested.

Web Summary : Three women arrested in Kolhapur for demanding ₹5 lakh to drop sexual assault charges. Police laid a trap near the bus stand, nabbing them red-handed while accepting money. The investigation is ongoing.