शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: राधानगरी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये बुडून तिघा पर्यटकांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2024 17:22 IST

गौरव सांगावकर  राधानगरी : राधानगरी धरणाच्या दाजीपूर-भटवाडी येथील बॅकवॉटरमध्ये दोन महिलांसह तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. सतिश लक्ष्मण टिपुगडे ...

गौरव सांगावकर राधानगरी : राधानगरी धरणाच्या दाजीपूर-भटवाडी येथील बॅकवॉटरमध्ये दोन महिलांसह तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. सतिश लक्ष्मण टिपुगडे (वय २६, मूळ गाव रा. भैरीबांबर ता. राधानगरी, सध्या रा. कागल ), अश्विनी राजेंद्र मालवेकर (३२, मूळ गाव सावर्डे ता. कागल सध्या रा. तळंगदे), प्रतिक्षा राजेंद्र मालवेकर (१३) अशी मृतांची नावे आहेत. ही घटना आज, गुरुवारी सकाळी उघडकीस आली. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सतिश टिपुगडे, अश्विनी मालवेकर, प्रतिक्षा मालवेकर हे सर्वजण राधानगरी पर्यटनासाठी काल, बुधवार दि. २९ रोजी भेटवाडी येथे आले होते. तेथे जेवणाचा बेत असल्याने सतीशने आपल्या नातेवाईकांच्या घरात भाकरी करण्यास सांगितले होते. पण रात्री उशीर झाला तरी भाकरी नेण्यास सतिश का आला नाही, हे पाहण्यासाठी नातेवाईकांनी शोधाशोध केली. पण ते आढळले नाहीत. आज, दुसऱ्या दिवशी सकाळी शोध घेतला असतात सतीशचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. तर शेजारीच आश्विनी व मुलगी प्रतिक्षा यांचा मृतदेह आढळला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. पाण्याचा अंदाज न आल्याने तिघे बुडाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेचे नोंद राधानगरी पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास डी.वाय.एस.पी शाहूवाडी विभागाचे आपासो पाटील व पो.नि.संतोष गोरे करीत आहेत.पर्यटकांनी काळजी घ्यावी राधानगरी हे पर्यटन स्थळ असून धरण, धबधबे, अभअरण्या पाहण्यासाठी प्रचंड गर्दी असते. पण पर्यटकांना स्थानिक स्थळांची परिपूर्ण माहिती नसते अशा ठिकाणी पर्यटक जातात आणि दुर्घटना घडते. त्यामुळे पर्यटकांनी माहिती नसलेल्या ठिकाणी जावू नये असे आवाहन पोलिस निरीक्षक संतोष गोरे यांनी केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरradhanagari-acराधानगरीdrowningपाण्यात बुडणेDeathमृत्यू