शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

रिक्त पदातील अदलाबदलीप्रकरणी तिघे कारवाईच्या फेऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 11:00 IST

शिक्षक बदली अंतर्गत सुरू असलेल्या समानीकरणाच्या प्रक्रियेत शिरोळ तालुक्यातील १२ शाळांमधील रिक्त पदामंध्ये अदलाबदली करणे, शिरोळ पंचायत समितीतील तिघांच्या अंगलट आले आहे.

ठळक मुद्देसीईओंच्या सहीने शिक्षणाधिकाऱ्यांची कारणे दाखवा नोटीस शिरोळमधील १२ शाळांच्या शिक्षक बदल्यांत घोळ

कोल्हापूर : शिक्षक बदली अंतर्गत सुरू असलेल्या समानीकरणाच्या प्रक्रियेत शिरोळ तालुक्यातील १२ शाळांमधील रिक्त पदामंध्ये अदलाबदली करणे, शिरोळ पंचायत समितीतील तिघांच्या अंगलट आले आहे.

या घातलेल्या घोळाबद्दल प्रथम दर्शनी दोषी आढळणाऱ्या गटशिक्षणाधिकाऱ्यांसह विस्तार अधिकारी व कनिष्ठ साहाय्यकांना कारणे दाखवा नोटीस प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी सीईओंच्या सहीनिशी बजावली. या प्रकरणामुळे एकूणच रिक्त जागा दाखविण्याच्या प्रक्रियेवर शंका घेतल्या जात आहेत.बदली पोर्टल अंतर्गत जिल्हा परिषदेतीलशिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सध्या सुरू आहे. मॅपिंग पूर्ण झाल्यानंतर समानीकरण, पती-पत्नी एकत्रिकरणासह माहिती संकलित करून तयार झालेल्या रिक्त जागांची माहिती या पोर्टलवर अपलोड करण्याचे काम शनिवारी रात्रीपर्यंत जिल्हा परिषदेत सुरू होते.

रविवारी मध्यरात्री हे बदली पोर्टल खुले करण्यात आले, दरम्यान हे करत असताना हे काम करणाऱ्या शिक्षक व काही कर्मचाऱ्यांना शिरोळमधील १२ शाळांमधील रिक्त जागांची माहिती बदलली जात असल्याचा संशय आला. आकडे वारंवार बदलत असल्याने याची चौकशी केली असता, गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या लॉगीनवरून हा प्रकार सुरू असल्याचे स्पष्ट झाले.हा प्रकार गंभीर असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तातडीने सीईओ व प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या कानावर हा प्रकार घालण्यात आला. हा प्रकार गंभीर असल्याने शिरोळचे गटशिक्षणाधिकारी आर. डी. काळणे, विस्तार अधिकारी डी. एल. कामत व कनिष्ठ साहाय्यक ए. व्ही. अस्वले यांना कारणे दाखवा नोटीस काढण्याचा निर्णय झाला.

प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी तशी टिप्पणी तयार करून सीईओ अमन मित्तल यांच्याकडे पाठविल्यानंतर त्यांनीही तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार या तिघा अधिकाऱ्यांना तातडीने खुलासा देण्यास सांगण्यात आले आहे.

दरम्यान, या प्रकरणानंतर शिरोळ तालुक्यातील शिक्षण विभागात खळबळ उडाली असून, कारभारावर शंका घेतल्या जात आहेत. रिक्त पदांत घोळ घातल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर तालुक्यातीलच काही जिल्हा परिषदेच्या कारभारी सदस्यांनी यावर पडदा टाकण्याच्या हालचाली सुरूकेल्या आहेत. याची चर्चा दिवसभर जिल्हा परिषदेत सुरू होती. 

 

टॅग्स :Teacherशिक्षकzpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर