शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

पानसरे हत्येमध्ये आणखी तिघांचा समावेश, संशयितांची कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 4:21 PM

ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्येपूर्वी सर्व संशयित आरोपींनी बेळगाव जवळील किणये येथे पाईप बॉम्ब प्रशिक्षण घेतले. त्यानंतर संशयित अमोल काळे, वासुदेव सूर्यंवशी यांचेसह आणखी तिघे कोल्हापूरातून एसटी बसने प्रवासात अडीच तासाच्या अंतरावरील जंगलव्याप्त भागात गेले. याठिकाणी घनदाट जंगलातील एका शेडमध्ये टारगेटवर एअरपिस्तुलवर सराव केल्याची माहिती एसआयटीच्या तपासात पुढे आली आहे.

ठळक मुद्देचार दिवसांची पोलीस कोठडीत वाढ : पानसरे हत्या प्रकरण वाढीव कोठडीची मागणी करणार

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्येपूर्वी सर्व संशयित आरोपींनी बेळगाव जवळील किणये येथे पाईप बॉम्ब प्रशिक्षण घेतले. त्यानंतर संशयित अमोल काळे, वासुदेव सूर्यंवशी यांचेसह आणखी तिघे कोल्हापूरातून एसटी बसने प्रवासात अडीच तासाच्या अंतरावरील जंगलव्याप्त भागात गेले. याठिकाणी घनदाट जंगलातील एका शेडमध्ये टारगेटवर एअरपिस्तुलवर सराव केल्याची माहिती एसआयटीच्या तपासात पुढे आली आहे.

या माहितीला संशयित सचिन अंदूरे याने दूजोरा दिला आहे. हत्येमध्ये आणखी तिघांचा समावेश असून त्यांचेसह कोणत्या जंगलात सराव केला त्याचा तपास एसआयटी करीत असल्याचे विशेष सरकारी वकील अ‍ॅड. शिवाजीराव राणे यांनी न्यायालयासमोर स्पष्ट केले.संशयित सचिन प्रकाशराव अंदूरे (वय ३२, रा. राजबाजार, जि. औरंगाबाद), अमित रामचंद्र बद्दी (२९, रा. हबीबी चाळ, हुबळी-धारवाड), गणेश दशरथ मिस्किन (३०, रा. गणेश देवस्थान समोर चैतन्यनगर, हुबळी) यांच्या १० दिवसांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने आज, सोमवारी त्यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. राऊळ यांच्यासमोर हजर केले. यावेळी तपासात निष्पन्न झालेले पुरावे न्यायालयासमोर हजर केल्याने त्यांच्या आणखी चार दिवसांच्या पोलीस कोठडीत वाढ केली.पानसरे हत्ये प्रकरणी सचिन अंदूरे याला विशेष न्यायालय पुणे आणि अमित बद्दी व गणेश मिस्किन यांना एन. आय. ए. न्यायालय मुंबई येथून ६ सप्टेंबरला ताबा घेवून कोल्हापूर एसआयटीने अटक केली होती. त्यांना दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.

दूसऱ्यांदा त्यांना सोमवारी न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायदंडाधिकारी राऊळ यांच्या समोर विशेष सरकारी वकील अ‍ॅड. शिवाजीराव राणे यांनी तपासाची माहिती दिली. त्यांनी सांगितले, पानसरे हत्येपूर्वी संशयितांनी विरेंद्र तावडे याच्या सांगण्यावरुन ‘पाईप बॉम्ब’ चे प्रशिक्षण बेळगाव जवळील किणये येथे घेतले. त्यानंतर सचिन अंदूरे हा कोल्हापूरात आला.

काहीकाळ त्याचे वास्तव कोल्हापूरात होते. तावडे याने दोन पुरोगामी विचारवंत व एक लेखक यांच्या रेकीसाठी बैठक घेतली होती. अंदूरे हा भौगलीक माहिती सांगतो परंतु ठिकाण सांगत नाही. अंदूरे याने अंबाबाई मंदिरापासून पानसरे यांचे कार्यालय तसेच मध्यवर्ती बसस्थानकापर्यंत रेकी केली होती.अमोल काळे आणि अंदूरे कोल्हापूरातून एसटी बसने अडीच तासाच्या अंतरावरील जंगलव्याप्त भागात गेले. या दोघांसह आणखी तिघांचा समावेश होता. जंगलातील एका शेडमध्ये टारगेटवर एअर पिस्तुलवर सर्वांनी सराव केल्याचे अंदूरे याने कबुली दिली आहे.

अंदूरे याने सात जिवंत काडतुसे तर गणेश मिस्किलने पिस्तुल आनली होती. वासुदेव सूर्यवंशी याने पिस्तुलातून फायरिंग केले होते, अशी माहिती पुढे आली आहे. अंदूरे हा महत्वाचा पुरावा आहे. तो अर्धवट माहिती देत आहे. तिघे अनोळखी व्यक्ती कोण? आहेत, त्यांनी कोणत्या जंगलात फायरिंगचा सराव केला याच्या तपासासाठी पोलीस कोठडी वाढवून द्यावी, अशी विनंती अ‍ॅड. राणे यांनी केली.

या युक्तीवादाला आरोपीचे वकील अ‍ॅड. समीर पटवर्धन यांनी आक्षेप घेत न्यायालयीन कोठडीची विनंती केली. दोन्ही वकीलांचे म्हणणे ऐकून न्यायाधिश राऊळ यांनी २० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी देखील न्यायालयासमोर तपासाची बाजू मांडली.अंदूरेने केली न्यायाधिशांकडे तक्रारसुनावणी संपलेनंतर संशयित सचिन अंदूरे याने न्यायाधिशांसमोर तपास अधिकारी अमृत देशमुख हे माझेवर दबाव टाकत आहेत. त्यांनी तुला ५० लाख रुपये देतो, कबुली देवून हा विषय संपव, आमच्या डोक्याचा त्रास कमी होईल. तुझ्या पत्नीच्या नावावर पैसे टाकतो. तसेच दोन दिवसापूर्वी भाऊ भेटायला आला असता त्याला आता सचिनचे संपलय सगळ, त्याच्या पत्नी, मुलांना सांभाळा अशी धमकी दिली. माझ्या सभोवती पोलीस उभे करतात.

बंदूक घेवून उभे असलेले पोलीस देखील माझेवर प्रश्नांचा भडीमार करतात. मला धक्काबुक्की केली आहे. देवीच्या मंदिरात मी गेलो होतो असे पोलीसांचे मत आहे. कधी गेलो होतो हे सांगत नाहीत. विनाकारण मला अडकविण्याचा प्रयत्न करीत असल्याची तक्रार केली. त्यावर न्यायाधिश राऊळ यांनी तुला मारहाण झाली का? असे विचारताच नाही म्हणून सांगितले. तुझी वैद्यकीय तपासणी करुया का? असे विचारताच त्याने नको म्हणून सांगितले. 

 

टॅग्स :Govind Pansareगोविंद पानसरेCourtन्यायालयkolhapurकोल्हापूर