शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! तृणमूलच्या आयटी विभागावर ईडीची रेड; ममता बॅनर्जी पोहोचल्या, फाईल्स ताब्यात घेतल्या...
2
निवडणुकीच्या धामधुमीत संजय राऊत आणि एकनाथ शिंदे यांची अचानक भेट, काय झाली चर्चा?
3
अनिल अग्रवाल यांच्या कुटुंबात कोण-कोण? आता कोणाच्या खांद्यावर असेल ३५,००० कोटींच्या वेदांता समूहाची जबाबदारी
4
फडणवीसांशी कोल्ड वॉर की मैत्री? अंबरनाथमध्ये विचारधारा पायदळी; एकनाथ शिंदेंनी सोडले मौन 
5
भारतातील १ कप चहाच्या किमतीत व्हेनेझुएलात मिळतंय ३ लिटर पेट्रोल; जाणून घ्या किती आहेत दर?
6
"निवडणूक आयोग माझ्या हातात असता, तर भाजपचे ४ तुकडे केले असते!" संजय राऊत यांचा हल्लाबोल
7
Ashes Test : ऑस्ट्रेलियाचाच बोलबाला! अ‍ॅशेस मालिका ४-१ अशी जिंकत इंग्लंडच्या साथीनं रचला विश्वविक्रम
8
पाकिस्तानच्या 'या' ३० वर्षांच्या मुलीने लष्कराच्या नाकी नऊ आणले! कोण आहे 'ही' सुंदरी?
9
आता भारतावर थेट 500% टॅरिफ लावणार ट्रम्प...! पुढच्या आठवड्यात मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?
10
Jagannath Puri: आजही गोडधोड पक्वान्न सोडून जगन्नाथाला पहिला नैवेद्य खिचडीचाच का?
11
Post Office च्या 'या' योजनेत गुंतवणूक करा, दरमहा मिळेल ५५५० रुपये निश्चित व्याज; कोणती आहे स्कीम, पाहा
12
तिलक वर्माची अचानक तब्येत बिघडली; तात्काळ शस्त्रक्रिया करण्याची वेळ! नेमकं काय झालं?
13
सारा तेंडुलकर मराठीत बोलली, आजीची गोड आठवण सांगितली; Viral Video पाहून नेटकरी फिदा
14
जगातील सर्वात 'बलाढ्य' विरुद्ध सर्वात 'कमकुवत' चलन; यांच्यासमोर अमेरिकी डॉलरही फिका
15
बँक ऑफ बडोदामधून ₹५० लाखांचं Home Loan घेण्यासाठी किती हवी सॅलरी? EMI किती असेल, पाहा
16
ढाका हादरलं! भरचौकात माजी नेत्याची निर्घृण हत्या; बांगलादेशात लष्कर तैनात, रस्त्यावर राडा
17
लोंढ्यांचा त्रास कोण भोगतोय? मांजरेकरांचा प्रश्न, उद्धव ठाकरे म्हणाले आपण...; मांजरेकर म्हणाले मध्यमवर्गीय...
18
'गृहिणी म्हणजे घराचं मॅनेजमेंट सांभाळणारा बिनपगारी जॉब, फक्त लक्षात ठेवा 'ही' एक गोष्ट!'-सद्गुरु
19
१० मुलींच्या जन्मानंतर ११वा मुलगा झाला! जन्मदाता पिता मात्र बेरोजगार; मनातील भावना सांगताना म्हणाले.. 
20
फडणवीस हे बसविलेले माणूस, पन्नास खोके हा गंमतीचा विषय नाही; राज ठाकरेंनी दिली ससाण्याची उपमा
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये नवे तीन न्यायमूर्ती; कर्णिक, चपळगावकर, दिगे यांची बदली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 19:03 IST

लवकरच नवीन डिव्हिजन बेंचसह दोन सिंगल बेंच सुरू होणार

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाच्याकोल्हापूर सर्किट बेंचचे प्रशासकीय न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्यासह एस. जी. चपळगावकर आणि शिवकुमार दिगे यांची बदली झाली. या ठिकाणी प्रशासकीय न्यायमूर्ती एन. व्ही. सूर्यवंशी, आर. जी. अवचट आणि वृषाली जोशी यांची नियुक्ती झाली. लवकरच सर्किट बेंचमध्ये आणखी एक डिव्हिजन बेंच आणि दोन सिंगल बेंच सुरू होणार आहेत.मुंबई उच्च न्यायालयातील एकूण १२ न्यायमूर्तींच्या प्रशासकीय बदल्या झाल्या आहेत. यात कोल्हापूर सर्किट बेंचमधील तीन न्यायमूर्तींचा समावेश आहे. प्रशासकीय न्यायमूर्ती कर्णिक आणि न्यायमूर्ती दिगे यांची मुंबई उच्च न्यायालयात बदली झाली. न्यायमूर्ती चपळगावकर यांची औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) खंडपीठात बदली झाली.रिक्त जागी एन. व्ही. सूर्यवंशी यांची प्रशासकीय न्यायमूर्तीपदी बदली झाली. तसेच न्यायमूर्ती आर. जी. अवचट आणि न्यायमूर्ती वृषाली जोशी यांची कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये बदली झाली. न्यायमूर्ती अवचट आणि जोशी यांनी यापूर्वी कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयात प्रमुख न्यायाधीश म्हणून काम पाहिले आहे. हेच डिव्हिजन बेंचचे काम पाहणार आहेत. नाताळच्या सुट्टीनंतर सोमवारपासून (दि. ५) सर्किट बेंचचे कामकाज सुरू होत आहे.सर्किट बेंचचा विस्तारसर्किट बेंचचा विस्तार होत असून, लवकरच आणखी एक डिव्हिजन आणि दोन सिंगल बेंच सुरू होणार आहेत. तिन्ही कोर्टरूमचे कामकाज अंतिम टप्प्यात आले आहे. सध्या सुरू असलेल्या डिव्हिजन बेंचच्या बाजूच्या स्वतंत्र इमारतीत डिव्हिजन बेंच सुरू होईल, तर सहा मजली इमारतीमध्ये दोन सिंगल बेंचचे कामकाज सुरू होईल. मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार लवकरच याचे उद्घाटन होईल, अशी माहिती वकिलांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Circuit Bench Gains New Judges; Karnik, Chapalgaonkar, Dige Transferred

Web Summary : Three judges transferred from Kolhapur Circuit Bench; three new judges appointed. Expansion plans include additional division and single benches to expedite legal proceedings after vacation.