शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

उताऱ्यातील बाहुल्यांवर एकाच कुटुंबातील तिघांची नावं, कोल्हापुरातील सादळे-मादळेत भानामतीच्या प्रकाराने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 17:06 IST

सतिश पाटील शिरोली : विधवा प्रथा बंदीचे ऐतिहासिक पाऊल, मुलानेच विधवा आईचा पुर्नविवाह लावून देत राज्यासमोर आदर्श निर्माण करणाऱ्या कोल्हापुरात ...

सतिश पाटील

शिरोली : विधवा प्रथा बंदीचे ऐतिहासिक पाऊल, मुलानेच विधवा आईचा पुर्नविवाह लावून देत राज्यासमोर आदर्श निर्माण करणाऱ्या कोल्हापुरात गेल्या काही दिवसापासून भानामतीचे प्रकारांना ऊत आला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत तर हे प्रकार आणखीनच वाढल्याचे पाहायला मिळाले. यातच आता पुन्हा एकदा करवीर तालुक्यातील सादळे-मादळे गावात बुटीत उतारा टाकुन उताऱ्यातील बाहुल्यांवर एकाच कुटुंबातील तिघांची नावे लिहिल्याची घटना समोर आली आहे. याप्रकारामुळे गावात एकच खळबळ उडाली.सादळे मादळे येथील चौकात एका बुटीत उतारा टाकुन  उताऱ्यातील बाहुल्यांवर विक्रम पाटील, निलेश पाटील आणि निखिल पाटील यांची नावे लिहून उतारा टाकण्यात आला आहे. त्यामुळे राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी कोल्हापूर जिल्ह्याची वाटचाल अंधश्रद्धेकडे होऊ लागली की काय? अशी शंका उपस्थित होत आहे.या प्रकारानंतर पाटील कुटुबांतील निखिल यांनी त्या उताऱ्याजवळ जाऊन अशा प्रकारांना घाबरत नाही, आम्ही शिकलेली माणसे आहोत. अजूनही लोक अंधश्रद्धेत जगतात हे योग्य नाही. यातून आम्हाला आणखी ऊर्जा मिळाली. आम्ही चांगली कामे करत राहू. असल्या भोंदूबाबांना आणि अंधश्रद्धेला बळी पडू नका, हा प्रकार निंदनीय असून काही साध्य होणार नसल्याचे सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी