शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Politics: महायुतीमधील तीन आमदार नाराज?, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2024 13:35 IST

दरम्यान, जागा वाटपावरून खासदार धनंजय महाडिक यांनी सूचक वक्तव्य केले

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीला पाठिंबा देणारे तीन आमदार नाराज असल्याचे समजते. मुख्यमंत्री शिंदे यांच्याजवळ या तिन्ही आमदारांनी लोकसभा निवडणुकीच्या चर्चेत सामावून न घेतल्याची तक्रार केली आहे.कोल्हापूर विमानतळाच्या नूतन टर्मिनन्स इमारतीच्या लोकार्पण समारंभासाठी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात आले होते. कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीमधील आमदार आणि खासदार कार्यक्रमाला हजर होते. मुख्यमंत्री शिंदे तीन दिवसांत दोन वेळा कोल्हापूर दौऱ्यावर आल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांची उमेदवारी धोक्यात असल्याने शिंदे यांनी दोघांसाठी बळ लावले असताना महायुतीमधील नाराजी समोर आली आहे. विमानतळाची पाहणी करताना महायुतीला पाठिंबा देणाऱ्या या आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करत व्यथा मांडल्या. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीला पाठिंबा देणाऱ्या कोल्हापुरातील अपक्ष आमदारांची नाराजी पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्यात जिल्ह्यातील तीनपैकी दोन अपक्ष आमदारांनी नाराजी व्यक्त करत आमच्या भावना वरिष्ठापर्यंत पोहोचवा, अशी विनंती केली आहे.चर्चेत सामावून न घेतल्याची तक्रार

  • भाजपकडून दोन्ही मतदारसंघांवर थेट दावा करताना कोल्हापुरात समरजितसिंह घाटगे आणि हातकणंगलेत ताकदीच्या उमेदवाराची चाचपणी सुरू आहे. 
  • या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांच्याजवळ या तिन्ही आमदारांनी लोकसभा निवडणुकीच्या चर्चेत सामावून न घेतल्याची तक्रार केली. 
  • तीनपैकी दोघांनी भाजपला पाठिंबा दिला आहे तर एका आमदाराने शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. भाजपला पाठिंबा दिलेल्या दोनपैकी एका आमदाराची भाजपकडून हातकणंगले लोकसभेसाठी चाचपणी सुरू आहे. 
  • त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्याची वेळ त्यांनी साधली आहे. विमानतळ येथील टर्मिनल इमारतीचे उद्घाटन पार पडल्यानंतर त्यातील एका आमदाराने तात्काळ तिथून काढता पाय घेतला. 
  • दरम्यान, जागा वाटपावरून खासदार धनंजय महाडिक यांनी सूचक वक्तव्य केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार कोल्हापुरात काहीही होऊ शकते, आम्ही एका जागेची मागणी केली आहे, असे विधान त्यांनी केले आहे.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेPoliticsराजकारणBJPभाजपा