शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

तीनशे रुपयांची लाच : चंदगडच्या महिला कॉन्स्टेबलला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2018 8:12 PM

पासपोर्टचे काम करुन देण्यासाठी तीनशे रुपयांची लाच स्वीकारताना चंदगड पोलीस ठाण्यातील महिला कॉन्स्टेबलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. दीपाली दशरथ खडके ( २८, रा. आत्याळ, ता. गडहिंग्लज) असे तिचे नाव आहे.

कोल्हापूर - पासपोर्टचे काम करुन देण्यासाठी तीनशे रुपयांची लाच स्वीकारताना चंदगड पोलीस ठाण्यातील महिला कॉन्स्टेबलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. दीपाली दशरथ खडके (२८, रा. आत्याळ, ता. गडहिंग्लज) असे तिचे नाव आहे. बुधवारी दूपारी चंदगड पोलीस ठाण्यात ही कारवाई झालेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. आज, गुरुवारी तिला गडहिंग्लज न्यायालयात हजर केले जाणार आहे. अधिक माहिती अशी, तक्रारदारांना भविष्यात परदेशी जावयाचे असलेने त्यांनी पासपोर्ट मिळणे करीता आॅनलाईन अर्ज केला होता. त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता तक्रारदार यांनी कोल्हापूर येथील पासपोर्ट कार्यालयामध्ये केली होती. या कार्यालयाने त्यांची चारीत्र पडताळणी करण्यासाठी कागदपत्रके चंदगड पोलीस ठाण्यास पाठविली. येथील गोपनिय व पासपोर्ट विभागाचे कामकाज दीपाली खडके पाहत होती. तिने अर्जावरुन तक्रारदारांना पोलीस ठाण्यात बुधवारी सकाळी बोलवून घेतले. पासपोर्टचे काम करुन देण्यासाठी तीनशे रुपयांची मागणी केली. त्यावर करुया असे म्हणून ते बाहेर पडले. त्यांनी थेट लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक गिरीष गोडे यांची भेट घेवून खडेकच्या विरोधात तक्रार दिली. पैसे गिळण्याचा प्रयत्नपोलीस उपअधीक्षक गोडे यांनी तत्काळ कारवाई करण्याची तयारी केली. दोन सरकारी पंचासमक्ष तक्रारदारांना चंदगड पोलीस ठाण्यात पाठविले. यावेळी खडके हिने तीनशे रुपयांची मागणी केलेचे निष्पन्न झाले. बाहेर पोलीस उपअधीक्षक गोडे, निरीक्षक प्रविण पाटील व त्यांचे सहकारी सापळा रचुन बसले होते. तक्रारदाराने पंचासमक्ष खडकेला तीनशे रुपये दिले. आजूबाजूला उभे असलेले पथकातील काही कर्मचारी आतमध्ये येताच खडेकच्या लक्षात आले. तिने हातातील तीनशे रुपये तोंडात टाकून चावून गिळण्याचा प्रयत्न केला. पथकातील महिला कॉन्स्टेबलने तिला जागेवर धरुन तिच्या तोंडातुन नोटांचे तुकडे बाहेर काढले. घराची झडती चंदगड पोलीस ठाण्यात महिला कॉन्स्टेबल लाच घेताना मिळून आलेच्या वृत्ताने पोलीस दलात खळबळ उडाली. कॉन्स्टेबल खडके हिच्या आत्याळ येथील घराची रात्री उशीरा पथकाने झडती घेतली. लाचलुचपत विभागाच्या कारवाईचा अहवाल प्राप्त होताच तिला खात्यातून निलंबित केले जाणार आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हाCorruptionभ्रष्टाचार