शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Crime: विशाळगडावर पार्टी करण्याचे ठरविले; दारू पाजून मित्राचा खून केला अन् मृतदेह दरीत फेकला, तिघांना जन्मठेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 12:09 IST

कोल्हापूर : घरातील लोकांना, नातेवाइकांना त्रास देत असल्याच्या कारणावरून मानोली (ता. शाहूवाडी) येथे मित्राचा खून केल्याचे सिद्ध झाल्याने जिल्हा ...

कोल्हापूर : घरातील लोकांना, नातेवाइकांना त्रास देत असल्याच्या कारणावरून मानोली (ता. शाहूवाडी) येथे मित्राचा खून केल्याचे सिद्ध झाल्याने जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांनी गुरुवारी तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.अमीर ऊर्फ कांचा अब्बास मुल्ला (वय २७), सुनील बाळू खोत (४८), सिद्धराम ऊर्फ सिद्धार्थ शांताप्पा म्हेतर (३०) आणि संजय शरद शेडगे (वय ३३, सर्व रा. लिंबू चौक, इचलकरंजी) अशी त्यांची नावे आहेत. यांपैकी शेडगे हा मयत आहे.या प्रकरणी पोलिस पाटील दत्तात्रय गोमाडे (वय ५९ रा. मानोली, ता. शाहूवाडी) यांनी फिर्याद दिली होती. आरोपींनी त्याचा मित्र संतोष मोहन तडाके (वय ३० रा. गुरू कनाननगर, इचलकरंजी) याचा २१ सप्टेंबर २०१९ ला मानोली येथे कोकण दर्शन पाॅइंटवर खून केला होता.आरोपी संजय शेडगे आणि मयत संतोष दोघेही मावस भाऊ होते. संतोष हा घरातील लोकांना, नातेवाइकांना त्रास देत होता.या कारणावरून शेडगे याने तिघा मित्रांना इचलकरंजी येथे बोलावून विशाळगड येथे पार्टी करण्याचे ठरविले. साक्षीदार राकेश जाधव याला फोन करून चारचाकी वाहनातून मानोली येथे गेले. तेथे संतोष याला दारू पाजून संशयितांनी त्यांच्या डोक्यात लोखंडी कोयत्याने वार करून चाकूने गळा कापला. त्याचा मृतदेह कोकण दर्शन पाॅइंटवरून दरीत फेकला.

वारूळ (ता. शाहूवाडी) येथे कडवी नदीच्या पात्रात रक्ताने माखलेले कपडे फेकून दिले. या प्रकरणातील गाइड दिनेशा कांबळे याने व्हिडीओ करून मित्राला पाठविला. पोलिस पाटील गोमाडे यांनी हा व्हिडिओ पाहून शाहूवाडी पोलिसांत फिर्याद दिली.शाहूवाडीचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक भालचंद्र देशमुख तपास अधिकारी होते. सरकारी वकील मंजूषा पाटील यांनी १७ साक्षीदार तपासले. चौकशीचे काम सुरू असताना आरोपी संजय शेडगे हा मयत झाला. आरोपीकडून जप्त केलेल्या वस्तू, पंचनामा, गुन्ह्याची कबुली आदी युक्तिवाद केला.

अमीर पन्हाळाकर, रंगराव भोसले, संजय कांबळे, आरती पडळकर, नोडल ऑफिसर तुषार नलवडे यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. कोर्ट पैरवी अधिकारी महिला काॅन्स्टेबल सीमा अष्टेकर यांचे सहकार्य लाभले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीichalkaranji-acइचलकरंजीCourtन्यायालय