खोचीत तीन फुटाची मगर जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:50 IST2021-09-02T04:50:43+5:302021-09-02T04:50:43+5:30
प्राणिमित्र व वनविभागाच्या साहाय्याने मगरीला जेरबंद करण्यात आले. वनविभागाचे साताप्पा जाधव, तेजस जाधव, अमोल सुतार, अमर चव्हाण, राकेश ...

खोचीत तीन फुटाची मगर जेरबंद
प्राणिमित्र व वनविभागाच्या साहाय्याने मगरीला जेरबंद करण्यात आले. वनविभागाचे साताप्पा जाधव, तेजस जाधव, अमोल सुतार, अमर चव्हाण, राकेश शिखरे, सचिन निकम, अमोल चव्हाण यांनी पकडून मगरीस नैसर्गिक अधिवासात सोडले.
गत व चालूवर्षीच्या महापुरापासून वन्यजिवांचे मनुष्यवस्तीत स्थलांतर झाले आहे . येथे विविध भागांत जवळपास आठ ते दहा मगरींचा वावर दिसून येत आहे. येथील एस.टी.स्टँड परिसरातील गावतळ्यात चार ते पाच मगरींचे वास्तव्य आहे. ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
वनविभागाने मगरीचे वास्तव्य असलेल्या ठिकाणी लक्ष ठेवून या मगरी पकडाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
फोटो - खोची येथे सूर्यकांत चव्हाण यांच्या गोठ्यात अडीच ते तीन फूट लांबीची मगर प्राणिमित्र अमर चव्हाण, अमोल सुतार, तेजस जाधव, राकेश शिखरे, सचिन निकम यांनी जेरबंद केली.