शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' तालुक्यातील तिघा शेतकऱ्यांना मिळाली परदेश वारीची संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 17:06 IST

विदेशातील आधुनिक कृषी तंत्रज्ञान पाहणार

कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाच्या वतीने राज्यातील शेतकऱ्यांना विदेशातील आधुनिक तंत्रज्ञान पाहण्यासाठी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावयाचे होते. कोल्हापूर जिल्ह्यातील १७ शेतकऱ्यांनी त्यासाठी अर्ज केले होते; परंतु जिल्ह्यासाठी केवळ तीन शेतकऱ्यांचे उद्दिष्ट असल्याने पात्र प्रस्तावांपैकी ३ जणांना ही संधी मिळणार आहे. याबाबतची निवड प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली असून जगदीश साताप्पा गोंगाने, निगवे खालसा, ता. करवीर, उत्तम इरगोंडा पाटील, कबनूर, ता. हातकणंगले, सुधीर मोतीराम लांडे, माणगाव ता. चंदगड या तिघांची या प्रक्रियेतून निवड करण्यात आली आहे.

कृषि कार्यालयातर्फे अभ्यास दौरामहाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागातर्फे या दौऱ्याचे आयोजन करण्यात येते. राज्यातील शेतकऱ्यांनी परदेशात जावे. तेथील आधुनिक शेतीची माहिती घ्यावी आणि आपल्या शेतामध्ये त्याचा अवलंब करावा आणि इतर शेतकऱ्यांना आपल्यापासून प्रेरणा द्यावी असा यामागचा हेतू आहे.

२५ शेतकऱ्यांचे अर्जकोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार एकूण १७ शेतकऱ्यांचे प्रस्ताव कृषी कार्यालयाकडे प्राप्त झाले होते. त्यातील विविध निकषांमध्ये न बसणारे पाच प्रस्ताव अमान्य करण्यात आले. उर्वरित १२ प्रस्तावांपैकी तिघांची सोडतीद्वारे निवड करण्यात आली.

५० टक्के खर्च शेतकऱ्यांचाशेतकऱ्यांच्या या विदेश दौऱ्यासाठी जो एकूण खर्च येणार आहे त्यातील ५० टक्के खर्च शेतकऱ्यांना करावा लागणार आहे. उर्वरित ५० टक्के खर्च शासन करणार आहे.

अनुदान किती ?यासाठी नेमके किती अनुदान उपलब्ध होणार आहे हे अजूनही निश्चित ठरलेले नाही.

कोणत्या देशात जाणार ?शेतकऱ्यांना नेमके कोणत्या परदेशांमध्ये नेण्यात येणार आहे हे देखील अजून निश्चित झालेले नाही.

कधी जाणार ?शेतकऱ्यांना कधी परदेशामध्ये न्यायचे हे राज्य पातळीवर नियोजन सुरू असल्याचे सांगण्यात आले.

शासनाच्या वतीने आयोजित या विदेश दौऱ्यासाठीची निवड प्रक्रिया १३ फेब्रुवारी २४ रोजी पार पडली आहे. याची पुढची प्रक्रिया शासनाच्या पुढील आदेशानुसार केली जाणार आहे. - अरुण भिंगारदेवे, जिल्हा अधीक्षक, कृषि अधिकारी, कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरairplaneविमानFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र