शहरं
Join us  
Trending Stories
1
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
2
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
3
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
4
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
5
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
6
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
7
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
8
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
9
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
10
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
11
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी
12
शालार्थ आयडी घोटाळा : छत्रपती संभाजीनगर बोर्डाच्या सचिव वैशाली जामदार यांना अटक
13
नागपुरात वासनांधाने ओलांडली विकृतीची सीमा, घोड्यासोबत अनैसर्गिक कृत्य
14
'मला पाडण्यासाठी भाजपने प्रयत्न केले', धर्मरावबाबा आत्राम यांचा राष्ट्रवादीच्या मेळाव्यातच आरोप
15
“ते हत्यार शोधून…” वैष्णवी हगवणे प्रकरणात वकिलांकडून मोठी अपडेट
16
'...तर आयफोनवर 25 टक्के टॅरिफ लागेल', भारतातील आयफोन निर्मितीत ट्रम्प यांचा खोडा, टिम कुक यांना इशारा
17
नागपूर शहरातील सराफा आणि हवाला व्यावसायिकांवर ईडीचे छापे, लखोटियांना घेतलं ताब्यात
18
Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणेचा सासरा आणि दीर दोघांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी
19
Virat Kohli: विश्वविक्रमापासून विराट कोहली फक्त ६३ धावा दूर; इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार!
20
भयानक वादळ, पाकिस्तानने एअरस्पेस नाकारली, मग हवाई दलाने सांभाळला मोर्चा, वाचवले २२७ प्रवाशांचे प्राण 

coronavirus: कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे तीन रुग्ण, वैद्यकीय सचिवांनी दक्ष राहण्याच्या दिल्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 12:29 IST

कोल्हापूर : जिल्ह्यात तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील एका रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला असून, दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार ...

कोल्हापूर: जिल्ह्यात तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील एका रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला असून, दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.कोल्हापूर महापालिका हद्दीतील ८३ वर्षांच्या वृद्धाला कोरोनाची लागण झाली होती. १२ मे राेजी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात आले आहेत. त्यातून ते बरेही झाले आहेत. पुणे जिल्ह्यातील एका ४० वर्षीय महिलेलाही कोरोनाची लागण झाली असून, त्यांचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शाहूवाडी तालुक्यातील एका ४० वर्षीय महिलेलाही कोरोनाची लागण झाली आहे. २० मे रोजी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यावरही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.कोरोनाबाबत दक्ष राहण्याच्या ‘सीपीआर’ला सूचनाकोरोनाबाबत दक्ष राहा, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे सचिव धीरजकुमार यांनी दिल्या आहेत. अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता त्यांनी याला दुजोरा दिला.सिंगापूर आणि हाँगकाँग येथे सध्या कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागली असून देशभरात १९ मेपर्यंत २५७ जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही याबाबत दक्षता घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या चाचणीसाठी लागणारे किट्स, व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन सिलिंडर्स, स्वतंत्र विभाग याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. २०२० आणि २०२१ या दोन वर्षांत कोरोनाने जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता. हजारो रुग्णांच्या मृत्यूमुळे महाराष्ट्र शासनाने त्यावेळी वेगळे चौकशी पथकही पाठवले होते. या पार्श्वभूमीवर देशभरात काही ठिकाणी पुन्हा कोरोनाच रुग्ण सापडू लागल्याने याबाबत प्राथमिक पूर्वतयारी करण्याच्या आणि दक्षता घेण्याच्या सूचना सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल