कोल्हापूरात तीन दुचाकींची गणेशोत्सवात चोरी, तक्रारी दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 04:11 PM2019-09-17T16:11:47+5:302019-09-17T16:13:36+5:30

कोल्हापूर : गणेशोत्सवात शहरात मिरजकर तिकटी, शाहू स्टेडीयम, शाहुपूरी या तीन ठिकाणी दुचाकी चोरीच्या घटना घडल्या. याबाबत जुना राजवाडा ...

Three bikes lodged in Kolhapur at Ganeshotsav, complaints lodged | कोल्हापूरात तीन दुचाकींची गणेशोत्सवात चोरी, तक्रारी दाखल

कोल्हापूरात तीन दुचाकींची गणेशोत्सवात चोरी, तक्रारी दाखल

Next
ठळक मुद्देकोल्हापूरात तीन दुचाकींची गणेशोत्सवात चोरीपोलीस ठाण्यात तक्रारी दाखल

कोल्हापूर : गणेशोत्सवात शहरात मिरजकर तिकटी, शाहू स्टेडीयम, शाहुपूरी या तीन ठिकाणी दुचाकी चोरीच्या घटना घडल्या. याबाबत जुना राजवाडा आणि शाहुपूरी पोलीस ठाण्यात चोरीच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत.

गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक पहाण्यासाठी अनिल हरिहळ पोळ (वय ४६ रा. २८६४ बी, जवाहरनगर, कोल्हापूर. सद्या-रा. तामगाव, ता. करवीर) हे गुरुवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आपली दुचाकी शाहू स्टेडीयमनजीक रावणेश्वर मंदीर परिसरात रस्त्याकडेला लावून गेले होते. त्यावेळी ती अज्ञात चोरट्याने चोरुन नेली. त्याबाबत पोळ यांनी, सुमारे २० हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरीची तक्रार जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिली.

तर दुसरी दुचाकी चोरीची घटना मिरजकर तिकटी दुध कट्टा येथे घडली. दिग्वीजय निवृत्ती जांभळे (रा. कांचनवाडी, ता. करवीर) हे आपली २० हजार रुपये किंमतीची दुचाकी (न. एम.एच.०९, डी.पी.९८९८) ही रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास मिरजकर तिकटी चौकात दुचाकी लावून गणपती विसर्जन मिरवणूक पहाण्याठी गेले होते. त्यावेळी ती अज्ञाताने चोरुन नेली.

शाहुपूरी २ री गल्ली येथे घराच्या दारात उभी केलेली आपली सुमारे ३५ हजार रुपये किंमतीची दुचाकी ( नं. एम.एच.०९, डीटी ५५७२)अज्ञाताने चोरुन नेल्याची तक्रार रोहन बाळासाहेब पाटील (रा. सद्या इ वॉर्ड, शाहुपूरी २ री गल्ली. मुळ रा. राशिवडे बुद्रुक, ता. राधानगरी) यांनी शाहुपूरी पोलीस ठाण्यात दिली आहे.
 

 

Web Title: Three bikes lodged in Kolhapur at Ganeshotsav, complaints lodged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.