शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: २५ लाख लुटीचा छडा; तिघांना अटक, तपासणी अधिकारी असल्याचे सांगून लंपास केली होती रक्कम

By उद्धव गोडसे | Updated: November 16, 2024 16:21 IST

रोकडसह दोन कार जप्त, आणखी दोघांचा शोध सुरू

कोल्हापूर : तावडे हॉटेल येथे तपासणी अधिकारी असल्याचे सांगून व्यावसायिकाची २५ लाख ५० हजारांची रक्कम लांबिवणा-या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छडा लावला. या गुन्ह्यातील तिघांना शुक्रवारी (दि. १५) दुपारी पुईखडी येथून अटक केली. त्यांच्याकडून लुटीतील २५ लाख रुपये आणि गुन्ह्यात वापरलेल्या दोन कार असा सुमारे ५५ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या टोळीतील तिघे संशयित सराईत गुन्हेगार आहेत.या गुन्ह्यातील संजय महादेव किरणगे (४२, रा. विक्रमनगर, ता. करवीर), अभिषेक शशिकांत लगारे (२४) आणि विजय तुकाराम खांडेकर (२८, दोघे रा. उचगाव, ता. करवीर) यांना पोलिसांनी अटक केली. स्वप्नील उर्फ लाला तानाजी जाधव (रा. पाचगाव) आणि हर्षद खरात (रा. राजारामपुरी) या दोघांचा अद्याप शोध सुरू आहे.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, यात्रेत पाळणे लावणारे व्यावसायिक सुभाष लक्ष्मण हारणे (वय ५०, रा. बागल चौक, कोल्हापूर) हे १२ नोव्हेंबरला पहाटे व्यवसायाची २५ लाख ५० हजारांची रक्कम घेऊन कर्नाटकातून तावडे हॉटेल येथे आले. खासगी ट्रॅव्हल्समधून उतरताच सर्व्हिस रोडला त्यांना पाच जणांच्या टोळीने अडवले. तपासणी अधिकारी असल्याचे सांगत त्यांची झडती घेतली.जवळ मोठी रक्कम असल्याचे दिसताच हारणे यांना कारमध्ये बसवून ते सरनोबतवाडीच्या दिशेने गेले. रक्कम आणि मोबाइल काढून घेऊन त्यांनी पोबारा केला होता. फिर्याद दाखल होताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या ६ पथकांनी संशयितांचा शोध सुरू केला होता. चार दिवसांत तिघांना अटक करून पोलिसांनी या गुन्ह्याचा उलगडा केला.

कार बदलून टोळी गोव्याला पळालीमोठी रक्कम हाताला लागताच बनावट तपासणी अधिका-यांची टोळी चित्रनगरीमार्गे पाचगावला पोहोचली. लुटीसाठी वापरलेली निसान कार ठेवून, दुसरी हॅरिअर कार घेऊन ते निपाणीच्या दिशेने गेले. कोगनोळी टोल नाक्यावर तपासणी नाक्यात अडकू नये आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसू नये यासाठी ते कोगनोळी गावातून पुढे कर्नाटकमध्ये गेले. त्यानंतर ते गोव्याला पोहोचले.असा झाला उलगडाअंमलदार वैभव पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी गुन्ह्याचा उलगडा केला. संशयित कारचे सीसीटीव्ही फुटेज मिळताच त्यावरून कारच्या मालकाचा शोध घेतला. कारच्या मालकाकडे चौकशी केल्यानंतर टोळीतील संशयितांची नावे समोर आली. त्यांचे मोबाइल लोकेशन गोव्यातील मिळताच पोलिसांचे एक पथक गोव्याला गेले. गोव्यातून कोल्हापूरला परत येणा-या टोळीतील तिघांना पोलिसांनी पुईखडी येथे पकडले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस