तलवारीने केक कापणाऱ्या तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:21 IST2020-12-24T04:21:12+5:302020-12-24T04:21:12+5:30
तलवारीने केक कापणाऱ्या तिघांना अटक * जयसिंगपूर पोलिसांची कारवाई जयसिंगपूर : तलवारीने वाढदिवसाचा केक कापून त्याचे फोटो सोशल मीडियावर ...

तलवारीने केक कापणाऱ्या तिघांना अटक
तलवारीने केक कापणाऱ्या तिघांना अटक
* जयसिंगपूर पोलिसांची कारवाई
जयसिंगपूर : तलवारीने वाढदिवसाचा केक कापून त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून दहशत निर्माण केल्याप्रकरणी जयसिंगपुरातील तिघा तरुणांना पोलिसांनी अटक केली. राहुल रामकृष्ण कांबळे, राहुल अरुण पवार व फकीरचंद साबू पाथरवट अशी संशयित आरोपींची नावे आहेत.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, सोमवारी (दि.२१) रात्री साडे नऊच्या सुमारास या तिघा संशयित आरोपीसह अन्य १४ ते १५ जणांनी एकत्र येऊन बावन्न झोपडपट्टी, हनुमान मंदिरजवळ वाढदिवस साजरा केला. यावेळी बेकायदेशीरपणे तलवारीने वाढदिवसाचा केक कापला. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून जनतेमध्ये त्याची दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे जयसिंगपूर पोलीस पथकाला संशयिताविरुद्ध सबळ पुरावा मिळून आल्याने राहुल कांबळे, राहुल पवार व फकीरचंद पाथरवट यांच्यासह चौदा ते पंधरा जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला. तिघांना अटक करण्यात आली असून, अशा प्रकारच्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांविरुद्ध जनतेने न घाबरता तक्रारी द्याव्यात, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.