धमकी देऊन शारीरिक संबंध; एकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:36 IST2021-02-23T04:36:49+5:302021-02-23T04:36:49+5:30

इचलकरंजी : कुटुंबातील लोकांना ठार करण्याची धमकी देत महिलेबरोबर शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी एकाला शहापूर पोलिसांनी रविवारी अटक केली. प्रकाश ...

Threatening physical contact; One arrested | धमकी देऊन शारीरिक संबंध; एकाला अटक

धमकी देऊन शारीरिक संबंध; एकाला अटक

इचलकरंजी : कुटुंबातील लोकांना ठार करण्याची धमकी देत महिलेबरोबर शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी एकाला शहापूर पोलिसांनी रविवारी अटक केली. प्रकाश मारुती सुतार (मूळ गाव धरणगुत्ती, ता. शिरोळ, सध्या रा. कल्पवृक्ष कॉलनी, शहापूर), असे त्याचे नाव आहे. त्याला जयसिंगपूर येथील न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, प्रकाश याचे संबंधित पीडित महिलेशी प्रेमसंबंध होते. त्यातून त्याने तिला घरातील लोकांना ठार करण्याची धमकी देत विविध हॉटेल आणि भाडोत्री खोलीत नेऊन शरीरसंबंध ठेवले. हा प्रकार १ जून २०१६ ते २१ नोव्हेंबर २०२० या कालावधीत घडला. त्यानंतर पीडित महिलेला तो त्रास देत होता. शिवीगाळ आणि मारहाणही करीत होता, असे तक्रारीत म्हटले आहे.

Web Title: Threatening physical contact; One arrested