ठळक मुद्दे फोटो यू ट्यूबवर टाकण्याची धमकीचार लाखांच्या खंडणीसाठी धमकावले
कोल्हापूर : मैत्रिणीसोबतचे फोटो यू ट्यूबवर टाकण्याची धमकी देऊन चार लाखांची खंडणी मागणाऱ्या विनोद पांडुरंग पाटील (रा. भादोले, ता. हातकणंगले) याच्याविरोधात करवीर पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल झाला.कंदलगाव रोडवरील मगदूम कॉलनीत राहणाऱ्या व व्यवसायाने टेलर असणाऱ्या कैश आब्बास शेख (वय ३०) याने पोलिसांत फिर्याद दिली आहे. दि. ७ एप्रिलच्या रात्री विनोद पांडुरंग पाटील याने कैश यास तुझ्या मैत्रिणीसोबतचे फोटो माझ्याकडे आहेत.
तू मला चार लाख रुपये दे; अन्यथा हे फोटो तुझ्या मेहुणीला, सासूला पाठवीन, अशी धमकी दिली होती, असे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक कोळेकर तपास करीत आहेत.