शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Bandh : औदुंबर पाटील यांची तात्पुरती बदली, अफवा पसरविणारे संदेश भोवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 18:02 IST

सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने दिलेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर राजारामपुरीचे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांची तात्पुरती कंट्रोल रुमला बदली केली. दिवसभर ते सीसीटीव्हीच्या कंट्रोल रुममध्ये बसून होते. त्यांचा राजारामपुरीचा पदभार पासपोर्ट विभागाचे पोलीस निरीक्षक प्रवीण चौगले यांच्याकडे दिला आहे.

ठळक मुद्देऔदुंबर पाटील यांची तात्पुरती बदली, अफवा पसरविणारे संदेश भोवले प्रवीण चौगले यांच्याकडे पदभार

कोल्हापूर : सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने दिलेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर राजारामपुरीचे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांची तात्पुरती कंट्रोल रुमला बदली केली. दिवसभर ते सीसीटीव्हीच्या कंट्रोल रुममध्ये बसून होते. त्यांचा राजारामपुरीचा पदभार पासपोर्ट विभागाचे पोलीस निरीक्षक प्रवीण चौगले यांच्याकडे दिला आहे.मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रमध्ये कोल्हापुरात शांततेत आंदोलन सुरू असताना राजारामपुरीचे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील हे पदाचा गैरवापर करून सोशल मीडियाद्वारे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल, अशा अफवांचे संदेश पाठवित आहेत.

आज, गुरुवारच्या ‘बंद’ आंदोलनात समाजमाध्यमांद्वारे काही तेढ निर्माण झाल्यास त्यास पोलीस निरीक्षक पाटील हेच जबाबदार राहतील. त्यामुळे त्यांना तत्काळ निलंबित करावे, या मागणीचे निवेदन बुधवारी (दि. ८) सकल मराठा समजाच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना दिले होते.

त्यानुसार देशमुख यांनी पोलीस निरीक्षक पाटील यांची तात्पुरती नियंत्रण कक्षाकडे बदली केली. त्यामुळे गुरुवारी दिवसभर पाटील नियंत्रण कक्षातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर नजर ठेवून होते. त्यांचा राजारामपुरीचा पदभार पोलीस निरीक्षक प्रवीण चौगले यांच्याकडे दिला आहे. ही बदली बंदच्या पार्श्वभूमीवर तात्पुरती असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी दिली.

टॅग्स :Maharashtra Bandhमहाराष्ट्र बंदkolhapurकोल्हापूरSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल