साडेतीन कोटींच्या रस्त्यात हजारो खड्ड

By Admin | Updated: November 11, 2014 00:12 IST2014-11-11T00:08:34+5:302014-11-11T00:12:32+5:30

रस्त्याची दुरवस्था : पाटपन्हाळा-वाशी मार्गे

Thousands of potholes in the streets of the three crores | साडेतीन कोटींच्या रस्त्यात हजारो खड्ड

साडेतीन कोटींच्या रस्त्यात हजारो खड्ड

बाजार भोगाव : खर्च कोटींत आणि खड्डे हजारात अशी दयनीय अवस्था पन्हाळा तालुक्यातील पाटपन्हाळा-वाशी रस्त्याची झाली आहे. त्यामुळे प्रवासीवर्गांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. ‘खड्डेमय’ रस्त्याला कोण वाली आहे का? अशी संतप्त प्रतिक्रिया वाहनचालकांतून होत आहे.पाटपन्हाळा-वाशी हा रस्ता जांभळी खोऱ्यातील प्रमुख मार्ग आहे. या मार्गावर मुगडेवाडी, सुंबेवाडी, सोनारवाडी, सावतवाडी, पिसात्री, गुरववाडी, खापणेवाडी, आढाववाडी, सपकाळवाडी आदी वस्त्या आहेत. पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून सुमारे साडेतीन कोटींपेक्षा जास्त रक्कम खर्च करून हा रस्ता तयार करण्यात आला, पण रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने काम झाल्यानंतर अवघ्या चार-पाच महिन्यांतच ठिकठिकाणी डांबरीकरण उखडून खड्डे पडू लागले आहेत. काही ठिकाणी रस्ता खचला आहे. याकडे यंत्रणेने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने लोकांच्या सोयीचा रस्ता डोकेदुखी बनला आहे.
दुचाकी, चारचाकी वाहनचालकांना प्रवास करताना मोठी कसरत करावी लागते. खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला काही शेतकऱ्यांनी कुंपणे घातल्याने रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे चारचाकी वाहने समोरासमोर आल्यावर मोठी गैरसोय होते.
रस्त्याच्या मोरींची उंची वाढविली असल्याने चारचाकी गाड्यांना अनेक अडचणी येतात. शिवाय पावसाळ्यात पाणी येत असल्याने रस्ता बंद होण्याचा कालावधी जास्त होता. त्यामुळे लोकांची मोठी गैरसोय होते. परिणामी मोरीची उंची वाढवावी, अशी मागणी ‘कुंभी’चे संचालक प्रकाश पाटील यांनी केली. आमदार चंद्रदीप नरके यांनी रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष देऊन सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी परिसरातून होत आहे.

Web Title: Thousands of potholes in the streets of the three crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.