शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: हजारांवर बनावट एचएसआरपी नंबरप्लेट वाहनांवर, आरटीओ कार्यालय नेमके करते काय?

By सचिन यादव | Updated: February 14, 2026 11:59 IST

खुलेआम केंद्रांकडे डोळेझाक, त्या वाहनधारकांना नोटिसा पाठविणार

सचिन यादवकोल्हापूर : रेडियमच्या दुकानात हुबेहूब बनावट एचएसआरपी नंबरप्लेट तयार करून दुचाकी, तीन चाकी आणि चारचाकी अशा सुमारे एक हजार वाहनांना बसविल्या असल्याची प्राथमिक माहिती तपासात पुढे येत आहे. साजणी (ता. हातकणंगले) येथे रेडियम कारागिराने हातोहात वाहनधारकांना गंडा घातला. खुलेआम ठिकठिकाणी ही एचएसआरपीची केंद्रे सुरू असताना प्रादेशिक परिवहन विभाग झोपला होता का, अशी तक्रार वाहनधारक करत आहेत. बोगस नंबरप्लेटची वाहने शोधायची कशी, असा प्रश्नही आरटीओ आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखेला पडला आहे.परिवहन विभागाने सन २०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांना शासनाने एचएसआरपी नंबर प्लेट बसवणे बंधनकारक केले. त्यासाठी वाहनधारकांना सरकारच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन नोंदणी करावी लागते. मात्र अनेकांनी ऑनलाइन नोंदणी करता येत नसल्याने ते खासगी केंद्रावर नोंदणीसाठी जातात. त्या ठिकाणी नोंदणीचा आणि एचएसआरपीच्या नंबरप्लेटसाठी आर्थिक लुटमार सुरू होते. सध्या शहरात ठिकठिकाणी एचएसआरपी नंबर प्लेट येथे बसवून दिल्या जातील, अशा जाहिराती केल्या आहेत. मात्र त्या अधिकृत किती आणि अनधिकृत किती आहेत, याची खातरजमा प्रादेशिक परिवहन विभागाकडून केली जात नाही.काय आहे प्रणाली?

परिवहन विभागाचे अधिकृत संकेतस्थळ https://transport.maharashtra.gov.in आहे. या संकेतस्थळावरून एचएसआरपीची ऑनलाइन नोंदणी केली जाते. त्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने जाहीर केलेल्या व्हेंडरकडून ही नंबरप्लेट बसविली जाते. त्यासाठी संबंधित केंद्राचा पत्ता, दिनांक आणि वेळ दिली जाते. ती बसविल्यानंतर त्याची नोंद प्रादेशिक परिवहन विभागाच्या पोर्टलला केली जाते.

पोलिसांकडून अहवाल आल्यानंतर डेटा तपासणारस्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने हा गुन्हा हातकणंगले पोलिस ठाण्याकडे वर्ग केला आहे. तपासात पोलिस किती वाहनांना नंबरप्लेट बसविल्या आहेत. त्याचा अहवाल पाठविणार आहेत. त्यानुसार प्रादेशिक परिवहन कार्यालय त्याचा डेटा तपासणार आहे.त्या वाहनधारकांना नोटिसा पाठविणारअधिकृत संकेतस्थळावरून नोंदणी न करता खासगी केंद्रावरून एचएसआरपी नंबरप्लेट काही वाहनधारकांनी बसविली आहे. पोलिसांकडून आलेल्या अहवालानंतर त्या वाहनधारकांना प्रादेशिक परिवहन अधिकारी नोटीस बजाविणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

भरारी पथक करते काय ?शहरात गल्लीबोळात एचएसआरपी नंबरप्लेट बसवून दे्ण्याचे फलक झळकले आहेत. त्याची खात्री करण्याचे काम प्रादेशिक परिवहन विभागाच्या भरारी पथकाने केले नाही. मुख्य व्हेंडरने ही उपकेंद्रे नेमल्याचा समज परिवहन विभागाच्या काही अधिकाऱ्यांना झाला. त्यामुळेच कारवाई केली नसल्याचे वाहनधारकांचे म्हणणे आहे.

आरोपीकडे तपास सुरू आहे. बनावट एचएसआरपी तयार करण्यासाठी अजून कोणाचा सहभाग आहे का, याची चौकशी सुरू आहे. त्याच्याकडे बहुतांशी वाहनधारकांना नंबरप्लेट बसविली असल्याची शक्यता आहे. - नानासाहेब पवार, सहायक पोलिस निरीक्षक, हातकणंगले 

विभागाने अधिकृत संकेतस्थळावरून नोंदणीचे आवाहन केले आहे. मात्र वाहनधारक खात्री न करता कोणत्याही दुकानांतून ही नंबरप्लेट बसवितात. बनावट नंबरप्लेटच्या कोडिंगमध्ये साधर्म्य नसल्यास त्या वाहनाचे कार्यालयाशी संबंधित कोणतेही काम केले जाणार नाही. - चंद्रकांत माने, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Fake HSRP Number Plates on Vehicles, What is RTO Doing?

Web Summary : Kolhapur RTO is under scrutiny as hundreds of vehicles sport fake HSRP number plates. A local radium shop is suspected of creating these plates. Authorities are investigating and warning vehicle owners about unauthorized HSRP installations.