शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
2
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
6
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
7
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
8
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
9
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
10
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
11
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
12
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
13
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
14
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
15
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
16
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
17
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
18
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
19
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
20
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

हेलिकॉप्टरमधून मतदार आणा म्हणणाऱ्यांची चौकशी व्हावी, जयंत पाटलांचा मुश्रीफांना अप्रत्यक्षरित्या टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2024 09:46 IST

Lok Sabha Election 2024 : चारवेळा पक्ष बदललेले संजय मंडलिक छत्रपतींच्या तोडीचे उमेदवार नाहीत, त्यामुळे त्यांच्याविषयी बोलण्याचे कारण नाही, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

गडहिंग्लज (जि.कोल्हापूर) :  हेलिकॉप्टरमधून मतदार आणा म्हणणाऱ्यांनी किती गोळा केले? त्याची चौकशी करण्यासाठी ही 'करेक्ट केस' आहे. परंतु,आमची परिस्थिती नाही. त्यामुळे आमचे मतदार पायी चालत, सायकलीने, बैलगाडीने येतील आणि राजर्षि शाहू महाराजांचा समतेचा विचार दिल्लीला पोहोचविण्यासाठी शाहू छत्रपतींनाच मतदान करतील,असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

दोन दिवसांपूर्वी कागलमध्ये संजय मंडलिक यांच्या प्रचाराची सभा पार पडली. यावेळी हेलिकॉप्टरने माणसं आणू, पण संजय मंडलिक यांना विजयी करू. आता देव आला तरी मंडलिक यांचा पराभव होणार नाही, असे विधान राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी केले होते. यावरून जयंत पाटील यांनी अप्रत्यक्षरित्या हसन मुश्रीफ यांना टोला लगावला आहे. कानडेवाडी येथे काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ आयोजित महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जयंत पाटील बोलत होते. 

या मेळाव्यात आमदार सतेज पाटील, माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, डॉ.नंदिनी बाभूळकर, व्ही.बी.पाटील, संजय पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. विरोधी उमेदवाराबद्दल बोलण्यासारखं काहीच नाही. ही तत्वांची, विचारांची लढाई आहे. चारवेळा पक्ष बदललेले संजय मंडलिक छत्रपतींच्या तोडीचे उमेदवार नाहीत, त्यामुळे त्यांच्याविषयी बोलण्याचे कारण नाही, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

भाजपने आजपर्यंत जाहीर केलेल्या उमेदवारांपैकी ११६ उमेदवार बाहेरचे आहेत. इंडिया आघाडी २५० जागेवर एकास एक लढत देणार आहे. त्यामुळे भाजप २०० जागादेखील स्वबळावर जिंकू शकणार नाही. त्यामुळे केंद्रात नक्कीच परिवर्तन होईल. खासदार बदला, परिस्थिती बदलेल, असे सतेज पाटील म्हणाले. तर महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी एकमताने दिलेली उमेदवारी म्हणजे रयतेची उमेदवारी आहे.एक जबाबदारी म्हणूनच ती स्विकारली आहे.सर्वांना विश्वासात घेऊन जिल्हयाच्या विकासाला चालना देणार आहे, असे शाहू छत्रपती म्हणाले.       नंदाताईंचे भावनिक आवाहन!आज बाबासाहेब कुपेकर असते तर शरद पवारसाहेबांसाठी त्यांनी छातीची कोट केली असती. त्यामुळे आपणही अडचणीच्या काळात पवारसाहेबांच्या पाठिशी उभे असून  लोकसभेच्या निमित्ताने पुन्हा सक्रिय झालो आहोत. ६ महिन्यात कसलाही विकास होणार नाही, त्यामुळे पवारसाहेबांना साथ देण्यासाठी कुपेकरांच्या सर्व कार्यकर्त्यांनी परत यावे, असे भावनिक आवाहन डॉ.नंदिनी बाभूळकर यांनी केले.

बंटींना दंड द्यावा लागेल!पुरोगामी कोल्हापूरकर जातीयवादी शक्तींना कधीच थारा देणार नाहीत, त्यामुळे शाहू छत्रपती किमान साडेतीन लाखांच्या फरकाने विजयी होतील. त्याची जबाबदारी 'बंटीं'वर आहे. दोन लाखांच्या खाली मताधिक्य आले तर त्यांना दंड द्यावा लागेल,असा चिमटा काढत  हातकणंगलेतून उद्ववसेनेच्या सत्यजित सरूडकरांना विजयी करण्याचे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४kolhapur-pcकोल्हापूर