उद्योजकांना बदमाश म्हणणाऱ्यांनी माफी मागावी -विश्वास पाठक यांच्या पुतळ्याचे उद्योजकांकडून प्रतिकात्मक दहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 19:36 IST2018-11-26T19:27:59+5:302018-11-26T19:36:29+5:30

कोल्हापूर येथे विविध औद्योगिक संघटनांच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी महावितरण सूत्रधार कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांच्या पुतळ्याचे सोमवारी सकाळी प्रतिकात्मक दहन केले.

Those who call industrialists a badge, they should apologize - symbolic combustion by the entrepreneurs of Faith Pathak | उद्योजकांना बदमाश म्हणणाऱ्यांनी माफी मागावी -विश्वास पाठक यांच्या पुतळ्याचे उद्योजकांकडून प्रतिकात्मक दहन

उद्योजकांना बदमाश म्हणणाऱ्यांनी माफी मागावी -विश्वास पाठक यांच्या पुतळ्याचे उद्योजकांकडून प्रतिकात्मक दहन

ठळक मुद्देउद्योजकांनी यावेळी केली. तसेच त्यांच्या पुतळ्याचेही प्रतिकात्मक दहन केले.अन्यथा कोल्हापुरात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा यावेळी उदय दुधाणे यांनी दिला.

कोल्हापूर : कोल्हापूर येथे विविध औद्योगिक संघटनांच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी महावितरण सूत्रधार कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांच्या पुतळ्याचे सोमवारी सकाळी प्रतिकात्मक दहन केले. या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने उद्योजक सहभागी झाले होते.

सकाळी साडेदहानंतर महावितरणच्या ताराबाई पार्कमधील कार्यालयासमोर मोठ्या संख्येने उद्योजक सहभागी झाले होते. महावितरण सूत्रधार कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी उद्योजकांचा उल्लेख बदमाश असा केला आहे. याबाबत निषेध करतानाच त्यांनी माफी मागावी, अशी मागणी उद्योजकांनी यावेळी केली. तसेच त्यांच्या पुतळ्याचेही प्रतिकात्मक दहन केले.यानंतर सर्व उद्योजकांनी कार्यकारी अभियंता शैलेंद्र राठोड यांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन सादर केले.

कोल्हापुरात पाय ठेवू देणार नाही
कपॅसिटर लावल्याशिवाय कोणताही उद्योग करता येत नाही. तेव्हा विश्वास पाठक यांनी आधी अभ्यास करावा. उद्योजकांना बदमाश म्हणणाºया पाठक यांनी माफी मागावी, अन्यथा कोल्हापुरात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा यावेळी उदय दुधाणे यांनी दिला.

Web Title: Those who call industrialists a badge, they should apologize - symbolic combustion by the entrepreneurs of Faith Pathak