शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

पावसाच्या लहरीवरच ठरणार यंदाचा ऊस गाळप हंगाम

By विश्वास पाटील | Updated: September 20, 2022 15:37 IST

परतीचा पाऊस दसऱ्यामध्ये पडला तर हंगाम सुरू होण्यास नोव्हेंबर उजाडू शकतो असे आजचे चित्र आहे.

विश्वास पाटीलकोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीने यंदाचा हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी धुराडे कधी पेटणार, हे पावसाच्या स्थितीवरच ठरणार आहे. परतीचा पाऊस दसऱ्यामध्ये पडला तर हंगाम सुरू होण्यास नोव्हेंबर उजाडू शकतो असे आजचे चित्र आहे.यंदा दसरा ५ ऑक्टोबरला आहे. दिवाळी २४ ऑक्टोबरला आहे. पश्चिम महाराष्ट्रात आजपासून पाऊस पूर्णत: पंधरा दिवस थांबला तरच १५ तारखेपासून हंगाम सुरू होईल अशी शेतीची स्थिती आहे. अजूनही मोठ्या प्रमाणात शेतात पाणी आहे. अलीकडील काही वर्षांत दसऱ्यातही पाऊस होत आहे तसे झाल्यास जाहीर केलेल्या तारखेला कारखाने सुरू होण्यास अडचणी येतील असे दिसते. मराठवाड्यात पावसाची फारशी अडचण नाही परंतु तिथे कारखाने लवकर सुरू होत नाहीत. कारण तिथे आडसालीचे क्षेत्रच नसते. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये गाळपासाठी त्यांना ऊसच उपलब्ध नसतो.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ऊस परिषद यंदा १५ ऑक्टोबरलाच आहे. यंदा एकरकमी एफआरपी देण्याची बहुतांशी सर्वच कारखान्यांची तयारी आहे. कोल्हापुरात जिल्हा बँकेच्या वार्षिक सभेत माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी तशी घोषणाच केली आहे; परंतु संघटनेने एकरकमी एफआरपीच्यावर टनाला किती देणार ते सांगा मगच उसाला हात लावा, अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्याचा परिणाम पश्चिम महाराष्ट्रातील हंगामावर होऊ शकतो.

यंदा पाऊस सरासरीएवढा झाला असला तरी कुठेच महापूर आलेला नाही. ऊसपिकाला लागेल तसाच पाऊस झाला आहे. त्यामुळे नदीकाठच्या पिकांचे अजिबात नुकसान झालेलेे नाही. परिणामी यंदाही गाळप जास्त होणार आहे. त्यामुळे हंगाम वेळेत सुरू करणे व त्यानुसार गाळपाचे नियोजन करण्याचे आव्हान राज्य सरकारसमोर आहे.

चढ-उतार असेही..साखर उद्योगातील जाणकारांच्या मते कोणत्याही कारखान्याचा १८० दिवसांचा हंगाम हा आर्थिकदृष्या योग्य मानला जातो. परंतु राज्यातील हंगामामध्ये त्यात बरेच चढ-उतार आहेत. गत हंगामात कोल्हापूर-१४४ दिवस, पुणे- १८०, सोलापूर-१७२, अहमदनगर-१८१,औरंगाबाद-१८८, नांदेड-१९१,अमरावती-१६६ आणि नागपूर विभागात १२४ दिवस हंगाम सुरू राहिला.

तीन जिल्ह्यांतच निम्मे गाळप

गतवर्षी सोलापूर, अहमदनगर व पुणे जिल्ह्यात ५६९ लाख टन गाळप झाले होते. राज्यात एकूण १३२० लाख टन गाळप झाले आहे. या तिन्ही जिल्ह्यातील हंगाम १५ पासून सुरू होऊ शकतो. कारण तिथे ऊसही भरपूर आहे आणि पावसाचीही अडचण फारशी येत नाही. पाऊस झाला तरी जमिनी निचऱ्याच्या असल्याने तोडी सुरू करता येतात.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने