शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

आजी-माजी नगरसेवकांची ‘दबंग’गिरी शहर अभियंत्यासह सुरक्षारक्षकास शिवीगाळ : महापालिका चौकात फासावर लटकविण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 1:06 AM

कोल्हापूर महापालिकेत आजी-माजी नगरसेवक तसेच त्यांच्या नातेवाईकांकडून महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाºयांना होणारी दमदाटी व शिविगाळ तशी नवी नाही.

ठळक मुद्दे फोन उचलला नाही म्हणून शहर अभियंत्यांना शिवीगाळ माजी उपमहापौर सचिन खेडकर यांची सुरक्षारक्षकास दमदाटीनिवृत्त जवानाचा आदर राखा

कोल्हापूर महापालिकेत आजी-माजी नगरसेवक तसेच त्यांच्या नातेवाईकांकडून महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाºयांना होणारी दमदाटी व शिविगाळ तशी नवी नाही. मात्र सोमवारी या साºयावर कढी करताना क्षुल्लक कारणावरुन एका नगरसेवकांने शहर अभियंत्यांना आपला फोन उचलला नाही म्हणून त्यांच्या कार्यालयात जावून शिवीगाळ केली तर पार्किंग करण्यासारख्या क्षुल्लक कारणावरुन माजी उपमहापौरांनी सुरुक्षा रक्षकास चौकातच फासावर लटकविण्याची धमकी दिली.फोन उचलला नाही म्हणून शहर अभियंत्यांना शिवीगाळकोल्हापूर : केवळ फोन उचलला नाही या क्षुल्लक कारणावरुन एका ज्येष्ठ नगरसेवकाने शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनाच शिवीगाळ केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली.याबाबत अधिक माहिती अशी, एक ज्येष्ठ नगरसेवक शहर अभियंता सरनोबत यांना फोन करत होते, परंतु कामात असलेल्या सरनोबत यांनी त्यांचा फोन उचलला नाही. याचा राग आल्याने सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास हे ज्येष्ठ नगरसेवक थेट महापालिकेत आले. त्यांनी सरनोबत यांचे कार्यालय गाठले आणि फ ोन का उचलला नाही म्हणून त्यांच्याशी हुज्जत घालून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. या अनपेक्षित प्रकाराने सरनोबत यांच्यासह कार्यालयातील सर्वच कर्मचारी अचंबित झाले. त्यांना कांहीनी समजाविण्याच प्रयत्न केला मात्र रागाचा पारा चढलेले हे नगरसेवक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. या घटनेबाबत सरनोबत यांच्याशी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल स्वीच आॅफ होता.तक्रार दिल्यास कारवाई करू : आयुक्तसोमवारी घडलेल्या दोन्ही घटना दुर्दैवी आहेत. संबंधित सुरक्षा रक्षकांशी बोलून त्यांना तुमची तक्रार असल्यास द्यावी म्हणजे मला पुढील कारवाई करणे सोयीचे होईल, असे सांगितले आहे. त्यांच्याकडून तक्रार आल्यास जरूर कारवाई करू, असे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.सायंकाळी शहर अभियंता सरनोबत यांना झालेल्या शिवीगाळीची माहितीही माझ्यापर्यंत पोहोचली, परंतु सरनोबत यांनी मला काहीच सांगिलेले नाही. त्यांचा फोन बंद आहे. आज, मंगळवारी मला त्यांच्याशी बोलावे लागेल असे सांगून आयुक्त म्हणाले की, जर असे प्रकार घडणार असतील, तर त्याला चाप लावण्याकरिता अधिकाºयांनीही मागे हटता कामा नये. पुढे येऊन तक्रार केली पाहिजे, म्हणजे संबंधितांवर कारवाई करता येईल.माजी उपमहापौर सचिन खेडकर यांची सुरक्षारक्षकास दमदाटीकोल्हापूर : महानगरपालिका चौकात चारचाकी वाहन योग्य ठिकाणी पार्किंग करा, असे सांगितल्यामुळे चिडलेल्या माजी उपमहापौर सचिन खेडकर यांनी ‘महापालिका चौकात झाडाला बांधून फासावर लटकावीन’ अशा शब्दांत सोमवारी दुपारी निवृत्त जवानाला दम देत शिवीगाळ केली. महापालिकेत सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाºया या निवृत्त जवानासह त्याच्या कुटुंबाचा अर्वाच्च भाषेत उद्धार करण्याच्या या प्रकारामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती.

शहरात महापालिकेवर होणारी आंदोलने, वारंवार निघणारे मोर्चे यामुळे कोणीही येतो आणि थेट महापालिकेच्या कार्यालयात घुसून अधिकाºयांना वेठीस धरतो म्हणून आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी खासगी कंपनीकडून सुरक्षा रक्षक घेतले आहेत. त्यांच्यावर विशेष करून मुख्य दरवाजाची तसेच चौकातील वाहनांच्या व्यवस्थित पार्किंगची जबाबदारी सोपविली आहे. गेल्याच आठवड्यात आयुक्तांनी केवळ अधिकारी, नगरसेवक आणि पत्रकारांच्या वाहनांनाच प्रवेश देण्याच्या तसेच अन्य नगरसेवकांचे नातेवाईक, स्वीय सहायक, कार्यकर्त्यांच्या वाहनांना प्रवेश देऊ नये, अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे सुरक्षारक्षकांनी आपले काम चोखपणे सुरू केले आहे.

सोमवारी दुपारी दोन वाजता नगरसेविका अनुराधा खेडकर यांचे पती व माजी उपमहापौर सचिन खेडकर त्यांची चारचाकी वाहन घेऊन महापालिका चौकात आले. त्यांनी वाहन पूर्व दरवाजाच्या आडवेच लावले. नेमके त्याचवेळी आयुक्त कार्यालयातूनबाहेर पडणार होते. त्यामुळे सुरक्षारक्षकाने पुढे जाऊन ‘तुमचे वाहन पदाधिकाºयांच्या गाड्या लागतात तेथे लावा’ असे सांगितले; परंतु त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले.

सुरक्षा रक्षकाचा जास्तच आग्रह झाल्यावर शिव्या देतच खेडकर यांनी आयुक्तांच्या वाहनाजवळच आपले वाहन लावले. त्यामुळे उत्तर दरवाजावर असलेल्या सुरक्षा रक्षकाने पुढे येऊन ‘तुम्ही येथे वाहन लावू नका, पदाधिकाºयांच्या वाहनाजवळ लावा’ असे सांगितले. त्याचा खेडकर यांना चांगलाच राग आला. त्यातून त्यांनी चारचौघांतच सुरक्षा रक्षकास अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

शिव्या दिल्या जात असतानाही सुरक्षा रक्षकांनी आपल्या कर्तव्यात कसूर केली नाही, त्यांना सक्तीने वाहन दुसरीकडे लावण्यास भाग पाडले. त्यावेळी खेडकर यांनी ‘जास्त आगावूपणा करू नकोस, या झाडाला बांधून फासावर लटकवीन, फासटून टाकीन’ अशा शब्दांत दमबाजी केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे महापालिका चौकात बरीच गर्दी झाली; परंतु कोणीही खेडकर यांना समजावण्याचा प्रयत्न केला नाही.निवृत्त जवानाचा आदर राखाही घटना घडली त्यावेळी कामानिमित्त आलेले नगरसेवक ईश्वर परमार यांनी सचिन खेडकर यांना समजावले. ‘लष्करात सेवा केलेले हे जवान आहेत. त्यांचा आदर राखण्याचा प्रयत्न करा. त्यांचा चार-चौघांत असा अपमान करू नका’ असे परमार यांनी सांगितले. त्यांनीच खेडकर यांना बाजूला नेल्याने या वादावर पडदा पडला.पगारापेक्षा पेन्शन जास्तया घटनेनंतर पत्रकारांनी सुरक्षा रक्षकांशी चर्चा केली. त्यावेळी ‘वाहन या ठिकाणी लावू नका, इकडे लावा’ एवढेच सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला. आम्हाला जे आदेश आहेत. त्याप्रमाणे आम्ही काम करतो. येथे मिळणाºया पगारापेक्षा पेन्शन जास्त आहे. शारीरिक तंदुरुस्ती व स्वास्थ्यासाठी नोकरी करतो; पण आदेशाप्रमाणे कर्तव्य बजावत असताना चारचौघांत एवढा अपमान करणे बरोबर नाही, अशा शब्दांत त्यांनी नापसंती व्यक्त केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण