शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

कोल्हापुरात तेरा वर्षीय शाळकरी मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू, मित्रासोबत गेला होता पोहायला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 12:04 IST

कोल्हापूर : कदमवाडी मुक्त सैनिक वसाहत परिसरातील काटे मळा येथील एका विहिरीत शाळकरी मुलगा बुडाला. पार्थ महेश परीट (वय ...

कोल्हापूर : कदमवाडी मुक्त सैनिक वसाहत परिसरातील काटे मळा येथील एका विहिरीत शाळकरी मुलगा बुडाला. पार्थ महेश परीट (वय १३, सध्या रा. मुक्त सैनिक वसाहत, मूळ रा. राधानगरी), असे त्याचे नाव आहे. काल, शुक्रवारी (दि.७) ही घटना घडली. अग्निशमन दलातर्फे त्याचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता, आज, शनिवारी सकाळी त्याचा मृतदेह हाती लागला. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, पार्थ याचे कुटुंब मूळचे राधानगरीमधील आहे. सध्या ते मुक्त सैनिक वसाहत परिसरात भाड्याने राहतात. त्याच्या वडिलांचा लॉण्ड्रीचा व्यवसाय आहे. पार्थ हा मुक्त सैनिक वसाहतीतील शा. कृ. पंत वालावलकर हायस्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकतो. शुक्रवारी सायंकाळी आपल्या दोन मित्रांसोबत तो काटे मळा परिसरातील विहिरीत पोहण्यासाठी गेला. त्याने पाण्यात उडी मारली, तो बुडू लागल्याने त्यांच्या मित्रांनी आरडाओरडा सुरू केली. त्याला वाचविण्यासाठी त्याच्या एका मित्राने विहिरीत उडी मारली, मात्र त्याला यश आले नाही. घडलेल्या घटनेची माहिती त्यांनी त्याच्या कुटुंबीयाला दिली. त्याचे आई-वडील आणि नातेवाईक धावतच त्या ठिकाणी आले. त्यांनी विहिरीवरच हंबरडा फोडला.परिसरातील नागरिकांनी अग्निशमन दलाला ही माहिती दिली. त्यांनी तत्काळ दोन अग्निशमन दलाच्या गाड्या त्या ठिकाणी पाठविल्या. दलाच्या पाच जवानांनी विहिरीत शोध मोहीम राबविली. मात्र त्याचा शोध लागला नाही. रात्री आठ वाजेपर्यंत ही मोहीम सुरू होती. आज, शनिवारी सकाळी त्याचा मृतदेह हाती लागला.

कष्टाळू कुटुंब.. मूळचे राधानगरीचेपार्थचे आई-वडील कष्टाळू आहेत. आई घरकाम आणि वडील काही वर्षांपासून या ठिकाणी लॉण्ड्रीचा व्यवसाय करतात. त्यांनी मुलाचे शिक्षण चांगले होण्यासाठी वालावलकर हायस्कूलमध्ये दाखल केले. मनमिळाऊ स्वभावाचा आणि खेळात प्रावीण्य असलेला म्हणून त्याची शाळेत ओळख आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरdrowningपाण्यात बुडणेDeathमृत्यू