साखरपा तपासणी नाक्यावर तेरा लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:18 AM2021-06-11T04:18:01+5:302021-06-11T04:18:01+5:30

अधिक वृत असे, देवाजे आपल्या पिकअप गाडीने (एम.एच.०९ ई.ए. ३१०५) कोल्हापूर येथून चिपळूणला मद्याचे बाॅक्स घेऊन निघाला होता. साखरपा ...

Thirteen lakh illicit liquor seized at sugar check post | साखरपा तपासणी नाक्यावर तेरा लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त

साखरपा तपासणी नाक्यावर तेरा लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त

Next

अधिक वृत असे, देवाजे आपल्या पिकअप गाडीने (एम.एच.०९ ई.ए. ३१०५) कोल्हापूर येथून चिपळूणला मद्याचे बाॅक्स घेऊन निघाला होता. साखरपा तपासणी नाक्यावर वाहनांची तपासणी करताना अवैध मद्याची निर्यात होत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी वाहनांसह मद्य जप्त केले. देवरूखचे पोलीस उपनिरीक्षक मारुती जगताप, पी.एस.आय. विद्या पाटील, सहायक फौजदार संजय उकार्डे, प्रवीण देशमुख, रोहित यादव, आदींनी कारवाई केली.

चौकटीसाठी-

कोविड संसर्गामुळे रत्नागिरी जिल्ह्यात १ ते ९ जून असा लॉकडाऊन होता. आज लॉकडाऊन उठताच महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढली. ही संधी साधून देवाजे याने अवैध वाहतूक केली. टीपीवर बापू वाईन्स असा उल्लेख आहे.

फोटो ओळी : साखरपा (जि. रत्नागिरी) येथील तपासणी पोलीस नाक्यावर अवैध मद्य, वाहन पकडण्यात आले. यामध्ये देवरूखचे पोलीस उपनिरीक्षक मारुती जगताप, विद्या पाटील व मध्ये बसलेला आरोपी सुरेश देवाजे.

Web Title: Thirteen lakh illicit liquor seized at sugar check post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.