शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

कोल्हापूर जिल्हा बँकेकडून तृतीयपंथीयांचे बचतगट : राज्यात पहिलेच पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 00:03 IST

कोल्हापूर : समाजाने झिडकारलेल्या तृतीयपंथीयांना सन्मान आणि स्थैर्य देण्यासाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्र्ती सहकारी बँकेने तृतीयपंथीयांचे बचतगट स्थापन केले असल्याची माहिती अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी

ठळक मुद्देसमाजाने झिडकारलेल्यांना सन्मान, कमी व्याजाचे कर्ज

कोल्हापूर : समाजाने झिडकारलेल्या तृतीयपंथीयांना सन्मान आणि स्थैर्य देण्यासाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्र्ती सहकारी बँकेने तृतीयपंथीयांचे बचतगट स्थापन केले असल्याची माहिती अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी येथे दिली. सामाजिक न्याय देण्यासाठी अशा प्रकारचे पाऊल उचलणारी जिल्हा बँक ही राज्यातील पहिली व एकमेव बँक असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयात या बचतगटांना प्रातिनिधिक स्वरूपात पासबुक वितरणाचा कार्यक्रम झाला. यावेळी ते बोलत होते. संचालक माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी आमदार पी. एन. पाटील, माजी खासदार निवेदिता माने, उदयानी साळुंखे, भय्या माने, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, विलासराव गाताडे, पी. जी. शिंदे, प्रा. संजय मंडलिक, सर्जेराव पाटील-पेरीडकर, अनिल पाटील, राजू आवळे, संतोष पाटील, रणजित पाटील, आर. के. पोवार, ‘नाबार्ड’चे महाप्रबंधक नंदकुमार नाईक, अ‍ॅड. दिलशाद मुजावर, बॅँक निरीक्षक राजू लायकर, आदी प्रमुख उपस्थित होते.

आमदार मुश्रीफ म्हणाले, ‘समाजाने झिडकारलेल्या या घटकांना सन्मानाने जगता यावे यासाठी बँकेतर्फे बचतगटाच्या माध्यमातून अर्थसाहाय्य केले जाणार आहे. अशा बचतगटांना कमी व्याजाचे कर्ज उपलब्ध करून दिले जाईल; तसेच त्यांना विविध व्यवसाय व उद्योगांचे प्रशिक्षण देऊन घरबसल्या रोजगार उपलब्ध व्हावा व अर्थार्जन होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न राहणार आहे.

अ‍ॅड. दिलशाद मुजावर म्हणाल्या, जिल्ह्यामध्ये नोंदीत तृतीयपंथीयांची संख्या १८०० असून, इचलकरंजी शहरात ती २५० आहे. या सर्वांच्या स्थैर्यासाठी जिल्हा बॅँंकेच्या सहयोगातून प्रयत्न केले जातील. डॉ. ए. बी. माने यांनी प्रास्ताविक केले.या बचतगटांची उपस्थितीयावेळी इचलकरंजी शहरातील आदिमाया बचतगटाचे काशिनाथ डोणे व राखी गोरवाडे, दिलासा स्वयंसाहाय्यता बचत गटाचे कुमार पाटील व अनिल कोलप, जगदंबा बचत गटाच्या मस्तानी नगरकर व संजना जाधव, रेणुका बचत गटाचे संतोष महाजन व नितीन पोवार, धावती रेणुका महिला बचत गटाच्या प्रिया ऊर्फ भरत सवाईराम, सुनील उत्करे, साईनाथ बचत गटाचे अशोक सूर्यवंशी व इस्माईल शेख, आदींची उपस्थिती होती.कोल्हापूर जिल्हा मध्यवर्र्ती सहकारी बॅँकेच्या कोल्हापुरातील मुख्य कार्यालयात गुुरुवारी अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते तृतीयपंथीयांच्या बचतगटांना प्रातिनिधिक स्वरूपात पासबुकांचे वितरण करण्यात आले. यावेळी संचालक निवेदिता माने, विलासराव गाताडे, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने, आदी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbankबँक