विचार करा, लिहिते व्हा... लीला पाटील

By Admin | Updated: May 28, 2017 17:49 IST2017-05-28T17:49:54+5:302017-05-28T17:49:54+5:30

९० व्या वाढदिनी सल्ला: मैत्रिणींची उपस्थिती

Think, write down ... Lila Patil | विचार करा, लिहिते व्हा... लीला पाटील

विचार करा, लिहिते व्हा... लीला पाटील

 आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. २८ : सृजन आनंद शाळेच्या संस्थापिका, शिक्षणतज्ज्ञ, प्राचार्या डॉ. लीला पाटील यांचा ९० वा वाढदिवस रविवारी साजरा झाला. मैत्रिणींच्या उपस्थितीत रंगलेल्या या वाढदिवसावेळी प्राचार्या डॉ. पाटील यांनी ‘विचार करा, लिहिते व्हा...’ असा सल्ला दिला. या वाढदिवसानिमित्त रुईकर कॉलनीतील प्राचार्या डॉ. लीला पाटील यांचे ‘सौरभ’ हे निवासस्थान त्यांची जुनी छायाचित्रे, रांगोळी काढून अगदी साधेपणाने सजविले होते.

या ठिकाणी सकाळी अकरा वाजल्यापासून त्यांच्या मैत्रिणी, विद्यार्थिनी येऊ लागल्या. दुपारी साडेबारा वाजता सर्वजणी एकत्र आल्यानंतर त्यांनी डॉ. लीला पाटील यांचे औक्षण केले. यानंतर उपस्थितांच्या आग्रहानुसार डॉ. पाटील यांनी स्वत:बाबत प्रसिद्ध झालेल्या एका लेखातील काही भागाचे वाचन केले. आज आपल्या देशातील परिस्थिती पाहता, प्रत्येकाने विचार करणे गरजेचे आहे. महिलांनी लिहिते व्हा. स्वत:च्या कमतरता शोधा, त्यांवर मात करा आणि सतत काम करीत रहा, असा सल्ला त्यांनी उपस्थितांना दिला. वाढदिवसाच्या छोटेखानी कार्यक्रमात त्यांचा उत्साह दिसून आला. त्यांनी उपस्थितांशी मनमोकळा संवाद साधला.

 

 

Web Title: Think, write down ... Lila Patil