इचलकरंजी : सांगली रोडवरील पाटील मळा, सहकारनगर व मंगळवार पेठ येथील घरातून व किराणा दुकानाचे कुलूप उचकटून चोरट्यांनी सुमारे ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याबाबत तिघांनी गावभाग पोलिसांत तक्रार दिली आहे.पाटील मळा येथे सुनील खोत यांच्या कल्पवृक्ष ट्रेडर्स या किराणा दुकानातील रोख रक्कम, सरकी आॅईलचे सात बॉक्स, सरकी लूज आॅईलचे दहा डबे, तांदूळ असा सुमारे ५२ हजार ३८६ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. त्याच परिसरातील एका औषध दुकानाचे शटर उचकटून चोरीचा प्रयत्न केला. सहकारनगर परिसरात राहणाऱ्या हसीना अल्लाउद्दीन बागवान यांच्या घराचे कुलूप उचकटून सुमारे दहा हजार ५०० रुपये रोख रक्कम चोरून नेले. त्या मिरज येथील आपल्या मुलाच्या घरी गेल्या होत्या.दरम्यान, मंगळवार पेठ परिसरातील हर्षद रमेश थोरवत यांच्या घरातून सहा हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरट्याने लांबविला. या चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी श्वान पथकास पाचारण केले. परंतु ते तेथेच घुटमळले.
इचलकरंजीत चोरट्यांचा धुमाकूळ, तीन ठिकाणी चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 15:10 IST
Crime News Kolhapur- सांगली रोडवरील पाटील मळा, सहकारनगर व मंगळवार पेठ येथील घरातून व किराणा दुकानाचे कुलूप उचकटून चोरट्यांनी सुमारे ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याबाबत तिघांनी गावभाग पोलिसांत तक्रार दिली आहे.
इचलकरंजीत चोरट्यांचा धुमाकूळ, तीन ठिकाणी चोरी
ठळक मुद्देइचलकरंजीत चोरट्यांचा धुमाकूळ, तीन ठिकाणी चोरी एका ठिकाणी प्रयत्न ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास