शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

चोरट्यांनी लंपास केले चक्क दोन लाखाचे डिझेल, वाढत्या दराचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 14:25 IST

पेट्रोल आणि डिझेलने उच्चांकी दर गाठल्यामुळे असेल कदाचीत पण मौल्यवान दागिने आणि रोकड चोरीऐवजी चोरट्यांनी आपला मोर्चा चक्क पेट्रोल आणि डिझेल चोरीकडे वळविल्याचे निदर्शनास आले आहे. आतापर्यंत अनेक किंमती साहित्याची किंवा मौल्यवान दागिन्यांची चोरी झाल्याची तक्रार आली होती, परंतु चक्क डिझेल चोरीची ही कोल्हापूर जिल्ह्यातील पहिलीच तक्रार आहे.

ठळक मुद्देचोरट्यांनी लंपास केले चक्क दोन लाखाचे डिझेल, वाढत्या दराचा परिणामचोरांचा मोर्चा आता चक्क इंधनचोरीकडे

कोल्हापूर : गेल्या आठवड्यातील पोलिस ठाण्यात आलेल्या एका अनोख्या तक्रारीमुळे पोलिस खाते चक्रावून गेले आहे. दागदागिने, घरफोडी, इतकेच नव्हे तर संगणकांच्या मदतीने एटीममधील रक्कम काढण्याच्या सायबर गुन्ह्याच्या तपासाऐवजी चक्क डिझेलच्या चोरीचा तपास करण्याची वेळ ग्रामीण पोलिसांवर आली आहे.पेट्रोल आणि डिझेलने उच्चांकी दर गाठल्यामुळे असेल कदाचीत पण मौल्यवान दागिने आणि रोकड चोरीऐवजी चोरट्यांनी आपला मोर्चा चक्क पेट्रोल आणि डिझेल चोरीकडे वळविल्याचे निदर्शनास आले आहे. आतापर्यंत अनेक किंमती साहित्याची किंवा मौल्यवान दागिन्यांची चोरी झाल्याची तक्रार आली होती, परंतु चक्क डिझेल चोरीची ही कोल्हापूर जिल्ह्यातील पहिलीच तक्रार आहे.गेल्या आठवड्यातच अज्ञात चोरट्यांनी १ लाख ५३ हजार रुपये किमंतीचे २0६८ लीटरचे डिझेल चोरीला गेल्याची तक्रार राधानगरी तालुक्यातील तुरंबे येथून आल्याने पोलिस चक्रावून गेले आहेत.राधानगरी तालुक्यातील तुरंबे या गावातील पेट्रोल पंपावरुन ही चोरी झाली असून राधानगरी पोलिसांत यासंदर्भात तक्रार नोंद झाली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महेश शांतीलाल निल्ले (वय ४८, रा. राधानगरी) यांचा तुरंबे येथे पेट्रोल पंप आहे. रविवारी सकाळी कर्मछारी डिझेलचा हिशेब घेताना टाकीतील डिझेलच्या साठ्यात तफावत असल्याचे निदर्शनास आले.१ सप्टेंबर रोजी मध्यरात्री आपल्या पेट्रोलपंपांचे कार्यालय बंद करुन निल्ले घरी गेले. सकाळी नेहमीप्रमाणे ते पेट्रोलपंपावर आले, तेव्हा अज्ञातांनी जमिनीखालील पंपाचे कुलूप तोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

पंपाला जोडलेले लोखंडी खांबही तोडल्याचे लक्षात आले. त्यावेळी त्यांनी पंपातील डिझेलच्या साठ्याची तपासणी केली असता त्यात तफावत असल्याचे निदर्शनास आले. पंपातील १ लाख ५३ हजार रुपये किमंतीचे २0६८ लीटर डिझेलची चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यावेळी प्रतिलीटर ७४.३७ रुपये इतका डिझेलचा दर होता.निल्ले यांनी बारकाईने पाहणी केली तेव्हा शेतवडीत डिझेल सांडल्याचे आणि वाहनांच्या टायरच्या खुणाही आढळल्या. रात्री बनावट किल्लीचा वापर करुन टाकीत पाईप टाकून हे डिझेल काढल्याचे स्पष्ट झाले आहे. रात्री पंपावर काही कर्मचारी मुक्कामी होते, त्यांना काही आवाज आल्याने त्यांनी उठून पाहिलेही, परंतु त्यांना कोणी न दिसल्याने ते पुन्हा झोपी गेले. या पेट्रोल पंपावर अनेक दिवसांपासून एक कुत्रे राखणीला होते. ते रात्री कोणालाही या परिसरात येउ देत नव्हते, पण पंधरा दिवसांपासून ते अचानक गायब झाले. चोरट्यांनीच टेहळणी करुन त्याला ठार मारल्याची शक्यता व्यक्त होत आहे.मूळात हा पंप गावाच्या थोडा बाहेर आहे. तेथे सुरक्षारक्षकही नेमलेला नव्हता आणि सीसीटीव्ही कॅमेराही बसवलेला नव्हता. राधानगरी गावाकडे जाणारा छोटा रस्ता येथूनच जातो. परंतु रात्रीच्यावेळी येथे फारशी रहदारी नसते. याचाच फायदा चोरट्यांनी उठवला असावा. निल्ले यांनी अखेर पोलिसांत धाव घेतली. या अनोख्या चोरीची तक्रार ऐकून पोलिसही चक्रावून गेले आहेत.

टॅग्स :Petrol Pumpपेट्रोल पंपCrime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर