शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलनस्थळी चोरट्यांनी केले हात साफ, चौघे संशयित ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 17:19 IST

Maratha Reservation Crimenews Police Kolhapur : मराठा आरक्षण मूक आंदोलनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता, तेथे भुरट्या चोरट्यांचाही मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट दिसून आला. या गर्दीत कार्यर्त्यांच्या खिशातील पाकीट मारणारे व सोन्याच्या चेनला हिसडा मारणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली होती. या चोऱ्या करण्यासाठी करमाळा (जि. सोलापूर) येथूनही भुरट्या चोऱ्या करणारी टोळी आल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देआंदोलनस्थळी चोरट्यांनी केले हात साफ, चौघे संशयित ताब्यात करमाळा येथून भुरट्या चोरट्यांची टोळी आल्याचा संशय

कोल्हापूर : मराठा आरक्षण मूक आंदोलनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता, तेथे भुरट्या चोरट्यांचाही मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट दिसून आला. या गर्दीत कार्यर्त्यांच्या खिशातील पाकीट मारणारे व सोन्याच्या चेनला हिसडा मारणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली होती. या चोऱ्या करण्यासाठी करमाळा (जि. सोलापूर) येथूनही भुरट्या चोऱ्या करणारी टोळी आल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.मराठा समाज आरक्षण आंदोलनासाठी राज्यातून निमंत्रितांना बोलावले होते. या आंदोलनाची सुरुवात कोल्हापुरातील ऐतिहासिक नर्सरी बागेतून होणार असल्याने तेथे मोठी गर्दी होणार, हे अपेक्षितच होते. हाच फायदा घेत परजिल्ह्यातील पाकीटमार चोरट्यांनी या आंदोलनाकडे लक्ष वेधले. या चोरट्यांनी आंदोलनस्थळी झालेल्या गर्दीचा फायदा उठवत काही कार्यकर्त्यांच्या खिशातील पैशाची पाकिटे चोरली तसेच काहींच्या गळ्यातील सोन्याच्या चेनचीही चोरी झाली.

या चोरीची माहिती मिळताच पोलिसांनी साध्या गणवेशातील पोलीस गर्दीत सोडले. त्यावेळी पैशाचे पाकीट तसेच सोन्याची चेन चोरणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस तसेच लक्ष्मीपुरी पोलिसांनी पकडले. यामुळे ही चोरट्यांची टोळी हात साफ करण्यासाठी आली असल्याच्या शक्यतेने पोलिसांनी परिसरातील काही लॉजचीही तपासणी केली, त्यावेळी करमाळा (जि. सोलापूर) येथील चार संशयित युवकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्या चारही संशयितांकडे सायंकाळी उशिरापर्यंत पोलीस अधिकारी चौकशी करत होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMaratha Reservationमराठा आरक्षणkolhapurकोल्हापूर