शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: फॅन, टीव्ही, सिलिंडर, कपडे... चोरट्यांनी हाती लागेल ते लंपास केले

By उद्धव गोडसे | Updated: April 23, 2024 12:50 IST

कोल्हापूर : कसबा बावडा येथील अंडी उबवणी केंद्राचे बंद कार्यालय आणि कदमवाडीतील राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजच्या प्राचार्यांचे निवासस्थान चोरट्यांनी ...

कोल्हापूर : कसबा बावडा येथील अंडी उबवणी केंद्राचे बंद कार्यालय आणि कदमवाडीतील राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजच्या प्राचार्यांचे निवासस्थान चोरट्यांनी फोडले. शनिवारी (दि. २०) रात्री ते सोमवारी (दि. २२) पहाटेच्या दरम्यान झालेल्या चोरीत चोरट्यांनी फॅन, टीव्ही, लॅपटॉप, प्रिंटर, गॅस सिलिंडर, कपडे असे हाताला लागेल ते सुमारे ९० हजारांचे साहित्य लंपास केले. यावरून चोरट्यांनी बंद घरे आणि कार्यालये पुन्हा टार्गेट केल्याचे दिसत आहे.शाहूपुरी पोलिसांकड़ून मिळालेल्या माहितीनुसार, कसबा बावडा येथील अंडी उबवणी केंद्रात सोमवारी सकाळी कर्मचारी पोहोचल्यानंतर चोरी झाल्याचा प्रकार निदर्शनास आला. चोरट्यांनी कार्यालयाचा दरवाजा उचकटून आतील तीन संगणक संच, तीन प्रिंटर, एक टेबल फॅन, एक लॅपटॉप, इन्व्हर्टर व बॅटरी असे सुमारे ६१ हजारांचे साहित्य लंपास केले. याबाबत कार्यालयातील अधिकारी डॉ. वर्षा शिवाजी मिंड (वय ३४, रा. कसबा बावडा, कोल्हापूर) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. दरम्यान, कदमवाडी येथील राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजच्या परिसरातील प्राचार्यांचे बंद निवासस्थान फोडून चोरट्यांनी चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत लक्ष्मण ज्ञानदेव कदम (वय ५९, रा. शाहू कॉलेज, कदमवाडी) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. चोरट्यांनी घरातील एक गॅस सिलिंडर, पंखा, इन्व्हर्टर आणि बॅटरी आणि कपाटातील कपडे असा ३० हजारांचा मुद्देमाल लांबवल्याचा उल्लेख कदम यांनी फिर्यादीत केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चोरट्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस