शुगरमील परिसरात चोरट्यांनी बंद बंगला फोडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:23 IST2021-01-18T04:23:14+5:302021-01-18T04:23:14+5:30

कोल्हापूर : कसबा बावडा, शुगरमील परिसरातील बंद बंगल्याचा कडी कोयंडा उचकटून अज्ञात चोरट्याने घरफोडी करून २५ हजारांच्या रोकडसह एकूण ...

Thieves broke into a closed bungalow in the Sugar Mill area | शुगरमील परिसरात चोरट्यांनी बंद बंगला फोडला

शुगरमील परिसरात चोरट्यांनी बंद बंगला फोडला

कोल्हापूर : कसबा बावडा, शुगरमील परिसरातील बंद बंगल्याचा कडी कोयंडा उचकटून अज्ञात चोरट्याने घरफोडी करून २५ हजारांच्या रोकडसह एकूण २८ हजारांचा मुद्देमाल लांबवला. याप्रकरणी सुधीर शशिकांत चव्हाण (रा. सरनाईक माळ, सम्राटनगर) यांनी शाहुपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

सम्राटनगरमधील सुधीर चव्हाण यांचा शुगरमील परिसरात आणखी एक बंगला आहे. तेथे कोणीही राहण्यास नसल्याने कुलूप बंद आहे. दि. १४ सप्टेंबर २०२० रोजी ते घराला कुलूप लावून सम्राटनगरातील घरी आले होते. त्यानंतर गुरुवारी (दि. १४) ते पुन्हा बंगल्याकडे गेले. त्यावेळी बंद बंगल्याचा कडी कोयंडा उचकटला दिसला, दरवाजाला आतून कडी घातली होती. चव्हाण यांनी पाठीमागील अर्धवट उघड्या दरवाजातून आत प्रवेश केला असता अज्ञात चोरट्याने घरातील सर्व प्रापंचिक साहित्य विस्कटले होते. कपाटातील २५ हजारांची रोकड तसेच तीन हजार रुपये किमतीचा म्युझिक सिस्टीम असा सुमारे २८ हजारांचा मुद्देमाल चोरीस गेला. चोरीची त्यांनी शाहुपुरी पोलिसांत तक्रार दिली.

Web Title: Thieves broke into a closed bungalow in the Sugar Mill area