मोरेवाडीत चोरट्यांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:31 IST2021-02-17T04:31:17+5:302021-02-17T04:31:17+5:30

कोल्हापूर : मोरेवाडी परिसरात सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी विविध ठिकाणी चोऱ्या करून धुमाकूळ घातला. केदारनगरातील किराणा दुकानाचे कुलूप तोडून ...

Thieves are rampant in Morewadi | मोरेवाडीत चोरट्यांचा धुमाकूळ

मोरेवाडीत चोरट्यांचा धुमाकूळ

कोल्हापूर : मोरेवाडी परिसरात सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी विविध ठिकाणी चोऱ्या करून धुमाकूळ घातला. केदारनगरातील किराणा दुकानाचे कुलूप तोडून साहित्य चोरून नेले, तर परिसरातील दीप्ती रेसिडेन्सीमधील दोेन फ्लॅट व अन्य एका बंगल्याचेही कुलूप उचकटून चोरीचा प्रयत्न झाला. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. चोरीच्या तक्रारी घेण्याचे काम मंगळवारी रात्री उशिरापर्यंत करवीर पोलिसात सुरू होते.

केदारनगरात शिवाजी बरगे यांचे किराणा साहित्य विक्रीचे दुकान आहे. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून काऊंटरमधील चार हजाराची रोकड व साहित्‍य चोरून नेले. परिसरातील दीप्‍ती अपार्टमेंटमधील दोन फ्‍लॅट चोरट्यांनी फोडले, तर एका बंगल्‍याचेही कुलूप तोडून आत प्रवेश केला. पण, बंगल्‍याचे मालक पुण्‍यात असल्‍याने चोरीबाबत सविस्तर माहिती समजू शकली नाही. चोरीची माहिती मिळताच त्‍यांच्‍या कोल्‍हापुरातील नातेवाईकांनी घटनास्थळी येऊन येथे पाहणी केली. या घरफोड्यांच्या नोंदी करण्‍याचे काम मंगळवारी रात्री उशिरापर्यंत करवीर पोलीस ठाण्‍यात सुरू होते.

Web Title: Thieves are rampant in Morewadi